दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:37+5:302021-09-24T04:38:37+5:30
लोहारा : लोहारा तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या समोर फकिरा ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्याही ...

दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
लोहारा : लोहारा तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या समोर फकिरा ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्याही दिवशी गुरुवारी सुरूच आहे.
लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजुरांना गट नंबर ९८ मधील २५ आर जमीन मोजणी करून देण्यात यावी, लोहारा तालुक्यातील विधवा महिला, परितक्त्या महिलांना तातडीने घरकुल मंजूर करण्यात यावे आदी मागण्यांसाठी फकिरा ब्रिगेडच्या वतीने तहसील व पंचायत समिती कार्यालयासमाेर उपाेषण सुरू करण्यात आले आहे. मागण्यांच्या अनुषंगाने कुठलेही आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे गुरुवारी दुसऱ्या दिवशीही हे उपाेषण सुरूच हाेते. आंदाेलनात फकिरा ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडाळे, महिला आघाडी अध्यक्षा पार्वती झुंजारे, जिल्हा संघटक सोमनाथ देडे, हिराबाई निकम, ज्ञानोबा काळे आदी सहभागी आहेत.