स्वखर्चातून केली पाणी पुरवठ्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:34+5:302021-07-05T04:20:34+5:30
देशमुख यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार पेठसांगवी : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथील उद्योजक महेश माणिकराव देशमुख यांनी स्वखर्चातून इमामसाहेब माळ ...

स्वखर्चातून केली पाणी पुरवठ्याची सोय
देशमुख यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
पेठसांगवी : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथील उद्योजक महेश माणिकराव देशमुख यांनी स्वखर्चातून इमामसाहेब माळ येथील साठ घरांच्या वस्तीला नवीन पाईपलाईन व विद्युत मोटार टाकून घरोघरी नळाद्वारे पाण्याची सोय केली. याबद्दल तेथील रहिवाशांनी शुक्रवारी त्यांचा सत्कार केला.
पेठसांगवी येथील इमामसाहेब देवस्थान हे प्रसिद्ध आहे. देशमुख हे दर्शनासाठी येथे आले असता रहिवाशांनी तेथील पाणी प्रश्न मांडला होता. याची दखल घेत त्यांनी तातडीने स्वखर्चातून हा प्रश्न मार्गी लावला. गावात रोहयोअंतर्गत पाणी पुरवठा विहिरीचे काम सुरू असताना देशमुख यांनी या ठिकाणीही स्वखर्चातून विहिरीची शासकीय मंजुरीपेक्षा जास्ती खोली घेतली. या सत्कार कार्यक्रमाला माजी सरपंच सदानंद बिराजदार, सिद्धांपा महाजन, संजय माळी, दत्तू राऊत. पोलीसपाटील इश्वर सुरवसे, ज्ञानराज देशमुख, विजयकुमार देशमुख, गंगाराम माळी, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संजय दलाल, रघुनाथ माळी, महादेव घोडके, गोरख बनसोडे, महादेव माळी, शब्बीर मुजावर. बाबूलाल मुजावर, अमिन मुजावर, गुलाब मुजावर, इमाम मुजावर, दादा मुजावर, हुसेन मुजावर, रशीद मुजावर आदी उपस्थित होते.