शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फाेट; आठ मजूर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:09 IST

अचानक झालेल्या या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या पाच महिला व तीन पुरुष असे आठ मजूर जखमी

वाशी (जि. धाराशिव) : तालुक्यातील तेरखेडा येथील फटाका कारखान्यात २९ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फाेट झाला. या घटनेत पाच महिला व तीन पुरुष असे आठ कामगार जखमी झाले. यांपैकी पाच गंभीर जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे रेफर करण्यात आले; तर उर्वरित तिघा जखमींवर धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तेरखेडा शिवारातील शेती गट नं. १२८१ मध्ये छोटूमियाँ दारूवाले यांच्या मालकीचा बाबा फायर वर्क्स हा फटाके निर्मितीचा कारखाना आहे. बुधवारी दुपारी साधारणपणे अडीच वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या पत्र्याच्या गोदामामध्ये अचानक स्फोट झाला. कारखानदार मात्र शेतीचा बांध पेटत आल्यामुळे स्फोट झाल्याचे सांगत आहेत. दरम्यान, अचानक झालेल्या या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या पाच महिला व तीन पुरुष असे आठ मजूर जखमी झाले आहेत. यांपैकी अनिल तोरडमल, चंद्रकांत घाटुळे, साखरबाई गांधले, शोभा करडे, मंजुषा ओव्हाळ या गंभीर जखमींवर धाराशिव येथे प्रथमाेपचार करून साेलापूर येथे रेफर केले; तर अभिजित गायसमुद्रे, सोनाली गायसमुद्रे व शारदा ओव्हाळ यांच्यावर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमी कडकनाथवाडी येथील रहिवासी आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रकाश म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पाॅटवर धाव घेत पंचनामा केला. तसेच या संबंधीचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे.

कारखान्यांची झडती घेणारतेरखेडा येथे झालेल्या स्फोटाची पाहणी केली आहे. सततच्या घटना लक्षात घेता, तालुक्यातील फटाका कारखान्यांची तपासणीची माेहीम हाती घेण्यात येणर आहे. कारखाना चालकांकडे नियमानुसार परवाना आहे की नाही?, कारखान्याची जागा अकृषी केलेली आहे की नाही?, आदी बाबींची पडताळणी केली जाईल, असे वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारीfire crackerफटाके