जेवळी येथे आयसोलेशन सेंटरची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:00+5:302021-05-07T04:34:00+5:30

जेवळी व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यासाठी जेवळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत श्री बसवेश्वर प्राथमिक शाळेत ...

Establishment of Isolation Center at Jawali | जेवळी येथे आयसोलेशन सेंटरची उभारणी

जेवळी येथे आयसोलेशन सेंटरची उभारणी

जेवळी व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यासाठी जेवळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत श्री बसवेश्वर प्राथमिक शाळेत २५ खाटांचे कोविड आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी लोहारा तहसीलदार संतोष रूईकर, गटविकास अधिकारी एकिले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, डॉ. शिवराज मोघे, डॉ. संतोष ढोबळे, सरपंच मोहन पनुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, नगरसेवक शाम नारायणकर, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे उपस्थित होते.

यावेळी लोहारा तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिकाही देण्यात आली आहे. तसेच जेवळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ६ अपंग नागरिकांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. या आयसोलेशन सेंटरसाठी किरण गायकवाड यांनी २५ बेड व गाद्या उपलब्ध करून दिल्या. यावेळी आ. ज्ञानराज चाैगुले यांनी यापुढील काळातही शिवसेनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Web Title: Establishment of Isolation Center at Jawali