काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST2021-04-02T04:34:04+5:302021-04-02T04:34:04+5:30
नगर पंचायत तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून वेतनाकरिता देण्यात येणारा निधी हा ताेकडा आहे. याचा परिणाम थेट वेतन वितरणावर हाेत ...

काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांचे आंदाेलन
नगर पंचायत तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून वेतनाकरिता देण्यात येणारा निधी हा ताेकडा आहे. याचा परिणाम थेट वेतन वितरणावर हाेत आहे. अनेक वेळा विलंबाने वेतन मिळते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही मागणीनुसार निधी मिळत नाही. त्यामुळे नगरपालिका कर्मचारी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून १ एप्रिल राेजी काळ्या फिती लावून कामकाज केले. मागण्या मान्य न झाल्यास १५ एप्रिल राेजी लेखणी बंद आंदाेलन करण्यात येणार आहे. तर १ मेपासून बेमुदत कामबंद आंदाेलन सुरू केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन मुख्याधिकारी दीपक इंगाेले यांना देण्यात आला. यावेळीर नगर अभियंता गणेश जगदाळे, टी. के. माळी, राजकुमार आहेरकर, डी. पी. गजभिये, के. बी. फुसके, आर. डी. भोसले, पी. डी. नाईकवाडी, पी. व्ही. गाढवे, दादा शेंडगे, सुनील शेटे, अनिल होळकर, प्रवीण निकाळजे, सतीश कोकणे, महिला कर्मचारी टी. एन. शिराळकर आदी आंदाेलनात सहभागी झाले हाेते.