विद्युत डीपी दुरुस्तीकडे सहा महिन्यांपासून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:44+5:302021-09-16T04:40:44+5:30

भूम : जळालेला विद्युप डीपी दुरुस्त करुन मिळावा, यासाठी मागील सहा महिन्यांपासून शेतकरी महावितरण कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु, ...

Electrical DP repairs neglected for six months | विद्युत डीपी दुरुस्तीकडे सहा महिन्यांपासून दुर्लक्ष

विद्युत डीपी दुरुस्तीकडे सहा महिन्यांपासून दुर्लक्ष

भूम : जळालेला विद्युप डीपी दुरुस्त करुन मिळावा, यासाठी मागील सहा महिन्यांपासून शेतकरी महावितरण कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु, महावितरणकडून याची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना वेळेत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी महावितरणने उच्च दाब विद्युत वाहिनीअंतर्गत ‘एक शेतकरी, एक डीपी’ ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत भूम शिवारात ३०४ सर्वेनंबरमध्ये हेमंत मुरलीधर गायकवाड, ज्ञानोबा शंकर वीर व जनार्दन क्षीरसागर तर स. नं. ३०२ मध्ये महादेव भानुदास साठे यांनी वीज या डीपीसाठी २०१७ मध्ये डिमांड भरले होते. यानंतर २०२० मध्ये या शेतकऱ्यांना डीपी बसवून देण्यात आल्या. दरम्यान, या चालू वर्षात एक-दोन महिन्यांच्या फरकाने या चारही विद्युत डीपी जळाल्या. याची दुरूस्ती करून मिळावी, यासाठी हे शेतकरी मागील सहा महिन्यांपासून महावितरण कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु, कुणीच याची दखल घेत नसल्याने शेतीपिकांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कनिष्ठ अभियंता शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कोट...

जळालेला डीपी दुरुस्त करून मिळावा, यासाठी आम्ही सातत्याने महावितरण कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहोत. परंतु, आम्हाला तिथे कुणीच दाद देत नाही. डीपी बंद असल्याचे पिकांचे नुकसान होत आहे.

- ज्ञानोबा शंकर वीर, शेतकरी

डीपीच्या दुरुस्तीसाठी मी दररोज वीज वितरण कार्यालयात जात आहे. परंतु, अधिकारी ‘आम्हाला एवढेच काम नाही’ असे म्हणून टोलवाटोलवी करतात. महावितरणने तातडीने डीपी दुरुस्त नाही केल्यास उपोषणाशिवाय पर्याय नाही.

- महादेव भानुदास साठे, हेमंत गायकवाड, शेतकरी

Web Title: Electrical DP repairs neglected for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.