खाद्यतेलाचा धावता ट्रक पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:44+5:302021-09-22T04:36:44+5:30
हैद्राबादहून उमरगामार्गे सोलापूरकडे एक ट्रक (केए ५६/४९२३) खाद्यतेलाचे बॉक्स घेऊन निघाला होता. मंगळवारी सकाळी तो येणेगूरच्या बेन्नीतुरा पुलानजीक ...

खाद्यतेलाचा धावता ट्रक पेटला
हैद्राबादहून उमरगामार्गे सोलापूरकडे एक ट्रक (केए ५६/४९२३) खाद्यतेलाचे बॉक्स घेऊन निघाला होता. मंगळवारी सकाळी तो येणेगूरच्या बेन्नीतुरा पुलानजीक आल्यानंतर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. ही बाब लक्षात येताच चालकाने वाहन बाजूला घेतले व तेथून पलायन केले. रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनचालकाने येणेगूर दूरक्षेत्रच्या पोलिसांना माहिती दिल्यानंतर यशवंत सगर, सुशांत मसाळ, भीमराव समुद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहदारी दुसऱ्या मार्गावर वळवली. यानंतर मुरुमच्या अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र, ते येईपर्यंत ट्रकमधील सर्व बॉक्स जळून खाक झाले. ट्रकही मोठ्या प्रमाणात जळाला आहे. दरम्यान, चालकाने पोबारा केल्यामुळे नेमका ट्रक कोणाचा याची माहिती पोलिसांनी आरटीओ कार्यालयातून मिळवीत मूळ मालकांशी संपर्क केला आहे. या घटनेची नोंद मुरुम ठाण्यात करण्यात आली असून, तपास सहायक निरीक्षक अशोक माळी व कर्मचारी यशवंत सगर करीत आहेत.