शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

‘कोरड्या’मुळे गाव सोडले; ‘ओल्या’मुळे जीवन संपले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 5:29 PM

घर पंचगंगेच्या कव्हेत निपचित पडल्याचे दिसताच हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू

ठळक मुद्देपुरामुळे कदमवाडी येथील साळोखे कॉलनीतील छोटेखानी घर सोडावे लागले पुतणीचे होते उद्या लग्न

- बालाजी आडसूळ

कळंब  (जि. उस्मानाबाद): दुष्काळामुळे गाव सोडलं...कोल्हापूर शहरातील करवीर नगरीत श्रमातून स्वत:चे नव विश्व निर्माण केलं...हक्काच छोटेखानी घरटं बांधल... परंतु, डोळ्यादेखत घरसंसार पाण्याखाली गेला अन् होत्याचं नव्हतं झालं...कोरड्या दुष्काळाने गाव सोडलेल्या कुटूंबावर पूर परिस्थितीने घातलेल्या घावामुळे मुंकूद कोकाटे या इटकूरकराचा हृद्यविकाराच्या धक्क्याने अंत झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

कळंब तालुक्यातील इटकूर येथील बाबूराव कोकाटे यांना पाच मुले. हाती जेमतेम कोरडवाहू जमीन. यातच दुष्काळ पाचवीला पुजलेला. यामुळे कोकाटे कुंटूबाची उपजिविका भागवली जात नसल्याने त्यांनी थेट कोल्हापूर गाठले. आहे त्या अल्पभू जमिनीवर भागेल या हिशोबाने एक मुलगा गावात थांबला अन् बाकीचे चार भाऊ कोल्हापूरात श्रमजीवी म्हणून मिळेल ते काम करू लागले. यात कोणी पेंटीगच्या तर कोणी सेंट्रीगच्या कामातून स्थिरस्थावर होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या भावंडापैकीच एक असलेल्या मुंकूद बाबूराव कोकाटे.  

मुंकूद यांनी कोल्हापूरात आपला जम बसवून कदमवाडी येथील साळोखे कॉलनीत छोटेखानी घरही बांधले होते. याठिकाणी आपला कामधंदा साभांळत मुंकूद यांचा सुखाचा संसार सुरू होता. पत्नी, एक मुलगा व तीन मुली अशा या परिवारासाठी पंचगंगेचा पूर मात्र होत्याचं नव्हतं करून गेला. पंचगंगेचे पाणी रस्त्यावरून घरात येत असतांना पुढे भयाण स्थिती ओढावेल याची पुसटशी कल्पनाही कोकाटे कुंटुबाला नव्हती. परंतु,नकळत दारातल्या पाण्याने घरात अन् घरातल्या पाण्याने छताला पार केले. घरासह संपूर्ण संसार पाण्यात बुडाला. धोक्याची पातळी वाढल्याने मग सुरक्षेसाठी अन्य ठिकाणचे नातेवाईकांचे घर गाठले. पाणी वाढतच असल्याने इथेही त्यांची घराची काळजी लागून राहिल्याने झोप उडाली होती. यातूनच शुक्रवारी पाय पुन्हा घराकडे वळले अन् पाहणीवेळी घर पंचगंगेच्या कव्हेत निपचित पडल्याचे दिसले. कष्टकरी असलेल्या मुंकूद यांच्या साठी हा मोठा धक्का होता. मोठ्या जड अंतकरणाने नातेवाईकांच्या घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. परंतु, हा प्रवास त्यांच्या जीवनाचा अंतीम प्रवासच ठरला. धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

इटकूरवर शोककळा...कोकाटे कुटुंबाने इटकूर (ता.कळंब) येथील दुष्काळी स्थितीमुळे गाव सोडले होते. यानंतर मोठ्या कष्टाने कोल्हापूरात संसाराचा जम बसवला. परंतु, दुष्काळाने गाव सोडण्याची वेळ आलेल्या कोकाटे कुटुंबातील मुंकूद यांना कोल्हापूरातील ओल्या दुष्काळाने मात्र अचानक ‘एक्झिट’  घ्यावी लागली. यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरात पोटापाण्यासाठी स्थिरस्थावर झालेली इटकूर येथील अशी वीसपेक्षा जास्त कुंटूब आहेत.

पुतणीचे होते उद्या लग्न....मुंकूद यांच्या लगतच विनोद हा भाऊ राहत आहे. या भावाच्या मुलीचे रविवारी लग्नकार्य नियोजित होते. याची आवश्यक ती तयारी ही झाली होती. अचानक ओढवलेल्या  पूर परिस्थीतीमुळे हे कार्य नियोजन पुढे ढकलले होते. परंतु, यासाठी केलेली खरेदी व साहित्य पुराच्या तडाक्यात सापडले आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद