तामलवाडी टोलनाक्याबर ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 09:42 IST2025-02-15T09:42:10+5:302025-02-15T09:42:37+5:30

पोलिसांनी  तिघा आरोपींना बेड्याही ठोकल्या आहेत.

Drugs seized at Tamalwadi toll plaza | तामलवाडी टोलनाक्याबर ड्रग्ज जप्त

तामलवाडी टोलनाक्याबर ड्रग्ज जप्त

तामलवाडी (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्यावर एका कारमधून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास केली. पोलिसांनी  तिघा आरोपींना बेड्याही ठोकल्या आहेत.

कारामधून ड्रग्ज आणण्यात येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलिसांनी तामलवाडी टोलनाक्यावर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता सापळा लावला. साधारणपणे पावणे अकरा वाजता कार आली असता, पोलिसांनी पकडली. झडती घेतली असता, 2 लाख 15 हजार रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज आढळून आले. यावेळी पोलिसांनी ड्रग्ज, कार जप्त करून तिघांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी रात्री उशिरा तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Drugs seized at Tamalwadi toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.