शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीचं स्वप्न अधुरचं! सरावादरम्यान मार्किंग करताना डाेक्यात गाेळा लागून तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:17 IST

धक्कादायक ! श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात रात्री उशिरा घडली घटना

- बाबुराव चव्हाण

धाराशिव : पाेलीस भरतीची तयारी करीत असलेले दाेघे मित्र बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात गाेळाफेकचा सराव करीत हाेते. हा सराव सुरू असतानाच फेकलेला गाेळा मार्कींग करणाऱ्या मित्राच्या डाेक्यात लागल्याने गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपस्थित डाॅक्टरांनी त्यास मयत घाेषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धाराशिव शहरातील दर्गाह परिसरातील गाझीपुरा भागातील रहिवासी असलेला तरूण मुस्तकीम जावेद काझी (२१) व त्याचा मित्र हे दाेघे मागील तीन-चार महिन्यांपासून पाेलीस भरतीची तयारी करीत आहेत. हे दाेघे गाेळाफेकचा सराव करण्यासाठी नियमितपणे श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात येत. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हे दाेघे क्रीडा संकुलात दाखल झाले. लागलीच गाेळा फेकण्याचा सराव सुरू केला. एकजण गाेळा फेकण्याचा सराव करीत असताना दुसरा त्याची मार्कींग करीत हाेता. आलटून-पालटून हा सराव केला जात हाेता. गाेळाफेकचा सराव झाल्यानंतर मुस्तकीम जावेद काझी हा तरूण मार्कींगसाठी पुढे गेला. याचवेळी मित्राने गाेळा फेकला असता, ताे काझी याच्या डाेक्यात लागला. गंभीर मार लागल्याने ताे जमिनीवर काेसळला. जखमी अवस्थेत त्यास मित्राने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, उपस्थित डाॅक्टरांनी त्यास मयत घाेषित केले. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर आनंदनगर पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलीस करीत आहेत.

नियमित सराव...मयत मुस्तकीम काझी व त्याचा मित्र हे दाेघेजण पाेलीस भरतीची तयारी करण्यासाठी नियमितपणे श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात येत हाेते. क्रीडा संकुलातील खेळाडू तसेच नागरिकांच्या गर्दीमुळे ते साधारपणे रात्री साडेसात ते आठ वाजता सरावाला सुरूवात करीत. बुधवारीही त्यांनी रात्री उशिराच सराव सुरू केला हाेता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद