१५ फेब्रुवारीला प्रारूप यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:25+5:302021-02-06T04:59:25+5:30
मराठी सहीसाठी पत्राद्वारे आग्रह उस्मानाबाद : मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील मराठी विषयाचे विषय साहाय्यक ...

१५ फेब्रुवारीला प्रारूप यादी
मराठी सहीसाठी पत्राद्वारे आग्रह
उस्मानाबाद : मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील मराठी विषयाचे विषय साहाय्यक समाधान शिकेतोड यांनी वर्ग १ व २ चे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना टपालपत्र पाठवून मराठीतूनच स्वाक्षरी करण्याचा आग्रह केला आहे. शिकेतोड यांनी आपल्या पत्रामध्ये मराठी भाषा विभागाच्या ७ मे २०१८ च्या शासन परिपत्रकाचा दाखला देत यात निर्देशित केलेल्या मुद्दा क्र. ४ नुसार मराठी स्वाक्षरीची विनंती केली आहे.
सल्लागारपदी शोभा करदुरे
लोहारा : अखिल विश्व वारकरी परिषदेच्या लोहारा तालुका सल्लागारपदी तालुक्यातील चिंचोली (काटे) येथील शोभा गोविंद करदुरे यांची नियुक्ती झाली आहे. अखिल विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सभप गुंडू भोसले महाराज, रामपूरकर यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले.
स्पर्धेसाठी होणार रविवारी चाचणी
उस्मानाबाद : नाशिक येथे होणाऱ्या सिनियर राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी रविवारी होणार आहे. या चाचणीतून जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी श्रीधर सोमवंशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेनेचे आज परंड्यात आंदोलन
परंडा : शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेट्राेल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यात तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे.
खंडित विजेमुळे नागरिक त्रस्त
वाशी : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मध्यंतरी महावितरणने भूम ते वाशी या विद्युत वाहिनीचे कंडक्टर बदलले. परंतु, त्याचाही काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.