शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्याविरूध्द दरोड्याचा गुन्हा

By admin | Updated: June 1, 2014 01:02 IST

उस्मानाबाद : दारू पकडल्याचा राग मनात धरून एका महिलेचा विनयभंग करीत मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : महिला बचत गटाच्या महिलांनी दारू पकडल्याचा राग मनात धरून एका महिलेचा विनयभंग करीत मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी दारूविक्रेत्यासह सहा जणांविरूध्द शनिवारी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी कनगरा (ता़उस्मानाबाद) येथे घडली. कनगरा येथील बचत गटाच्या महिलांनी अवैधरित्या दारूविक्री करणार्‍यांविरूध्द कारवाईची मागणी बेंबळी पोलिसांकडे केली होती़ मात्र, पोलिसांनी महिलांनीच दारू पकडून दाखवावी, अशा सूचना देत मागणीकडे दुर्लक्ष केले होते़ त्यामुळे संतप्त महिलांनी अवैधरीत्या दारूविक्री करणार्‍या शशीकांत राठोड याच्याकडील दारू पकडून पोलिसांना माहिती दिली होती़ मात्र, पोलिसांनी कारवाई न करता दारू सांडून दिली. तर शशीकांत राठोड याच्यासह इतरांनी एका महिलेच्या अंगावरील मणीमंगळसूत्र हिसकावून घेत तिचा विनयभंग केला़ यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केली़ या घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यासह आलेल्या शेकडो कर्मचार्‍यांनी घराचे दरवाजे तोडत ग्रामस्थांवर अमानुष लाठीहल्ला केल्याची तक्रार कनगरा ग्रामस्थांनी केली होती़ या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध झाला़ विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी कनगरा गावास भेट देऊन पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर सपोनि बनसोडे यांच्यासह इतर तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले़ अखेर गृहमंत्री आऱआऱपाटील यांनी शुक्रवारी कनगरा गावास भेट देवून ग्रामस्थांसमोरच पोलीस अधीक्षकांची हजेरी घेतली़ यावेळी त्यांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतानाच अवैध दारूविक्रेत्याविरूध्दही कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ दरम्यान, २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास दारूविक्रेत्या शशीकांत राठोड याच्यासह मीनाक्षी राठोड, शोभा राठोड, वकिल्या, छायाबाई, सोनाबाई राठोड यांनी संगणमत करून एका ३० वर्षीय महिलेस शिवीगाळ केली़ यावेळी शशिकांत राठोड याने तिचा विनयभंग केला तर वकिल्या याने गळ्यातील मंगळसूत्रासह दागिने ओढून घेतले़, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून वरील सहा जणांविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ पोलिसांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे तालुक्यतील कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबरोबरच तेथील १८ कुटुंबियाच्या घरांचे नुकसान केले असल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील कनगरा येथे दारूबंदीच्या कारणावरून झालेल्या वादातून सोमवारी रात्री शेकाडो पोलिसांनी ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण केली होती. यात अनेकांच्या घरांचेही पोलिसांनी नुकसान केले. पंचनाम्यानुसार लतीफ पठाण यांच्या घराचा चौकटीसह दरवाजा तुटून व स्वयंपाक घरातील अन्नधान्याची नासधूस झाली आहे. लहूराज रामभाऊ गुंड, युवराज बाबू माने, भैरु गोविंद भंडारकर, विजयकुमार गोविंद भंडारकर, दादासाहेब गोविंद भंडारकर, व्यंकट हरीबा धाराव, सुरेश दगडू माने, श्रीमंत अर्जुन इंगळे, वजीर इस्माईल शेख, अभिमन्यू इंगळे, नितीन हरिदास इंगळे, बाबूलाल अंबीर शेख, संजय शंकर धस, लक्ष्मण तुळशीराम गुजरे, अरुण पल्हाद इंगळे, रामराव नाना धाराव व लालासाहेब व इकाम शेख आदींच्या घराचेही पोलिसांनी नुकसान केले आहे.