डॉ. संदीप तांबारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:37+5:302021-09-22T04:36:37+5:30
येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप माणिकराव तांबारे हे मागील दोन दशकांपासून राज्यभर व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवत आहेत. ...

डॉ. संदीप तांबारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप माणिकराव तांबारे हे मागील दोन दशकांपासून राज्यभर व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवत आहेत. येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून पंधरा हजारावर व्यक्तिंना व्यसनापासून परावृत्त करण्यात यश मिळवले आहे. याशिवाय आयुष इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सच्या माध्यमातून संशोधन, समुपदेशन यावर भर दिला आहे. यातून त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर झाले आहेत. शिवाय, त्यांना विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. याशिवाय जैविक व सेंद्रीय शेती यातही त्यांचे काम आहे. महाएफपीओ फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या डॉ. तांबारे यांनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी ऑरगॅनिक मॉलही उभारला आहे.
या कार्याची दखल घेत मुंबई येथील ड्रीम्स प्रकाशन व सह्याद्री कॉलेज यांनी डॉ. संदीप तांबारे यांच्या कामाची दखल घेत त्यांना आपला 'ड्रीम्स समाजकल्याण' पुरस्कार जाहीर केला होता. याचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. यावेळी खा. गोपाल शेट्टी, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, पार्श्वगायक उदीत नारायण, ब्रह्मकुमारी योगिनी दीदी, मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्थेचे रुद्रप्रताप बिस्वास, सह्याद्री फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष डॉ दिलीपकुमार इंगवले आदींची प्रामुख्याने उपस्थित होती.