शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

मायबाप सरकार पुन्हा करू नका बेराेजगार; प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ-बहीण उतरले रस्त्यावर

By बाबुराव चव्हाण | Updated: February 13, 2025 17:03 IST

युवा कार्यप्रशिक्षण कालावधी ३६ महिने करा; धाराशिवमध्ये निघाला मूक माेर्चा

धाराशिव : विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने राज्यात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण याेजना हाती घेतली हाेती. सरकारी तसेच खाजगी अस्थापनेत त्यांना सहा महिन्यांसाठी नियुक्त करून प्रशिक्षण तसेच मानधनही देण्यात आले. सध्या यांचा कार्यकाळ संपत आला आहे. प्रशिक्षण घेवूनही आम्ही बेराेजगार हाेणार असल्याचे सांगत नियुक्तीचा कालावधी ३६ महिने करावा, अशी मागणी करीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक माेर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातील सुमारे पावणेपाच हजार लाडके भाऊ-बहीण रस्त्यावर उतरले हाेते.

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असतानाच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने सुशिक्षित बेराेजगार लाडके भाऊ-बहिणींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली हाेती. योजनेतून १२ वी उत्तीर्ण बराेजगार तरूणांना ६ हजार, आयटीआय आणि पदविकाधारकांना ८ हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्यांना १० हजार रुपये विद्यावेतन जाहीर केले. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी अस्थापनेवर सुमारे ४ हजार ९४९ लाडके भाऊ-बहीण नियुक्त केले. यापैकी काहींचा प्रशिक्षण कालावधी १३ फेब्रुवारी राेजी सरला. काहींचा १६, काहींचा २१ तर काहींचा कालावधीत २७ फेब्रुवारी राेजी संपत आहे.

‘‘प्रशिक्षण कालावधी सरल्याबराेबर आम्ही सुशिक्षित, प्रशिक्षित बेराेजगार हाेत आहाेत. त्यामुळे शासनाने आमचा कालावधी वाढवून ताे ३६ महिने करावा’’, अशी मागणी करीत गुरूवारी जिल्हाभरातील तब्बल ४ हजार ९४९ हून अधिक लाडके भाऊ-बहीण रस्त्यावर उतरले. महामानव डाॅ. बाबासाहेबा आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मूक माेर्चा काढण्यात आला. हा माेर्चा छत्रपती शिवाजी महाराज चाैकातून जिल्हा कचेरीवर धडकला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन धाडले.

आऊटसाेर्सिंग बंद करासरकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून (आऊटसाेर्सिंग) कंत्राटी तत्वावर कर्मचारी घेतले जात आहेत. यातून त्यांची खूप पिळवणूक हाेते. शासनाने अशा स्वरूपाचे आऊटसाेर्सिंग बंद करून थेट शासन टू शासकीय कार्यालय या पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण याेजनेतील बेराेजगार लाडके भाऊ-बहिणींना नियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी केली.

मायबाप सरकार पुन्हा करू नका बेराेजगारमूक माेर्चामध्ये सहभागी प्रशिक्षार्थिंनी आपल्या हातात फलकही घेतले हाेते. यापैकी काही फलक धाराशिवकरांचे लक्ष वेधून घेत हाेते. यापैकीच ‘‘मायबाप सरकार करू नका पुन्हा आम्हाला बेराेजगार’’ हा फलक लक्षवेधी ठरला.

टॅग्स :dharashivधाराशिवEducationशिक्षण