व्यावसायिक कारणासाठी घरगुती सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:39+5:302021-09-24T04:38:39+5:30

तुळजापूर : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी महसूल विभागाच्या पथकाने तुळजापूर-उस्मानाबाद राेडवरील ...

Domestic cylinders for commercial purposes | व्यावसायिक कारणासाठी घरगुती सिलिंडर

व्यावसायिक कारणासाठी घरगुती सिलिंडर

तुळजापूर : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी महसूल विभागाच्या पथकाने तुळजापूर-उस्मानाबाद राेडवरील हाॅटेल, ढाबे आदी व्यावसायिकांची झाडाझडती घेतली. यावेळी संबंधितांकडून सहा सिलिंडर जप्त केले. साेबतच गुन्हेही दाखल करण्यात आले.

तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक चहाचे गाडे, ढाबे, हाॅटेल आदी ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. या अनुषंगाने तक्रारी झाल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने तुळजापूर-उस्मानाबाद या राेडवरील व्यावसायिकांच्या दुकानांची झाडाझडती घेतली. यामध्ये उस्मानाबाद रोडवरील पटेल ढाबा येथे ५ घरगुती वापराचे सिलिंडर आढळले. तसेच जुना समाधान ढाबा येथे १ सिलिंडर आढळून आला. हे सर्व सिलिंडर जप्त केले. याप्रकरणी ढाबा चालक मनोज कांजीभाई पटेल व सागर सुरेश कदम यांच्याविरूद्ध मंडळ अधिकारी अनिल कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार संतोष पाटील, निरीक्षण अधिकारी संदीप जाधव, मंडळ अधिकारी पवन भोकरे, आण्णासाहेब यादव, बाळासाहेब जगताप, अनिल कुलकर्णी, अव्वल कारकून मारगुंडे, महसूल सहाय्यक प्रताप पाटील, कैलास ठमके, प्रकाश चंदनशिवे आदींचा समावेश हाेता.

Web Title: Domestic cylinders for commercial purposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.