डॉक्टर्स, शेतकऱ्यांचा भूममध्ये सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:10+5:302021-07-04T04:22:10+5:30
भूम : येथील नगर परिषदेच्यावतीने डाॅक्टर्स डे व कृषी दिनानिमित्त डॉक्टर्स तसेच शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक ...

डॉक्टर्स, शेतकऱ्यांचा भूममध्ये सत्कार
भूम : येथील नगर परिषदेच्यावतीने डाॅक्टर्स डे व कृषी दिनानिमित्त डॉक्टर्स तसेच शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप जोगदंड, डॉ. बालाजी बारसकर, डॉ. प्रितम भागवत, डॉ. प्रदीप मोरे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. श्रीकांत फलके, डॉ. एस. व्ही. जांबकावळे, डॉ. एस. बी. अंबुरे, डॉ. एस. पी. कुलकर्णी, डॉ. मधुकर बोटकर, डॉ. अमोल कुटे, डॉ. भगवान गोपाळघरे, डॉ. दुर्गा खैरे, डॉ. प्रतीक्षा जाधव, डॉ. सुषमा उगलमुगले, डॉ. ए. एन. शेंडगे, डॉ. सुचित कुटे, डॉ. प्रगती घुले, डॉ. दत्तात्रय घुले तसेच पीक स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल आरसोली येथील शेतकरी सोमनाथ मुंढेकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गटनेते संजय गाढवे, उपनगराअध्यक्षा संयोगिता गाढवे, नगरसेवक आश्रुबा नाईकवाडी, संदीप मोटे, किरण जाधव, नगरसेविका अनिता वारे, मेहराजबेगम सय्यद, ॲड. अमर ढगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन बालाजी माळी यांनी केले.
010721\10492526209-img-20210701-wa0053.jpg
नगर पालिका भूम यांच्या वतीन डॉ डे निमित्त सत्कार करताना गट नेते संजय गाढवे उपनगराअध्यक्षा संयोगीता गाढवे सोबत नगरसेवक आदी