डॉक्टर देता का डॉक्टर..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:22+5:302021-05-11T04:34:22+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या साडेसात हजारांवर गेली आहे. असे असताना ...

Doctor gives doctor ..? | डॉक्टर देता का डॉक्टर..?

डॉक्टर देता का डॉक्टर..?

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या साडेसात हजारांवर गेली आहे. असे असताना जिल्ह्यात डॉक्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांची संख्या मात्र तुटपुंजी आहे. त्यामुळे जिल्ह्याला तातडीने डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सध्या ७ हजार ६०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. आजवर एकूण ४४ हजार ६९८ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत, तर १ हजार ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा दर मराठवाड्यात सर्वाधिक २.३२ टक्के इतका आहे. एकीकडे रुग्णांची ही परिस्थिती असताना तुलनेने डॉक्टर्स खूप कमी आहेत. ६० आयसीयू बेडसाठी केवळ २ भीषक व २ भूलतज्ज्ञ आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन, बेड व आयसीयूची गरज वाढली असून, उपचारासाठी विशेषज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयांसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स व सपोर्टिंग स्टाफ तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केली. यावेळी प्रीतम मुंडे, प्रसाद मुंडे, स्वप्नील नाईकवाडी यांची उपस्थिती होती.

Web Title: Doctor gives doctor ..?