अन्नदानातून ५०० गरजू कुटुंबांची दिवाळी गोड; जनविश्वास बँकेने जपली सामाजिक बांधिलकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:09 IST2025-10-17T17:08:06+5:302025-10-17T17:09:10+5:30

मागील चार वर्षांपासून जनविश्वास को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करून दीपावलीचा आनंद वाटला जात आहे.

Diwali sweet for 500 needy families through food donation; Janvishas Bank upholds social commitment! | अन्नदानातून ५०० गरजू कुटुंबांची दिवाळी गोड; जनविश्वास बँकेने जपली सामाजिक बांधिलकी!

अन्नदानातून ५०० गरजू कुटुंबांची दिवाळी गोड; जनविश्वास बँकेने जपली सामाजिक बांधिलकी!

भूम (धाराशिव): “अन्नदान हे श्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून जनविश्वास बँकेचे चेअरमन संतोष सुरेश वीर यांनी आपल्या वडिलांची अन्नदानाची परंपरा अधिक जोमाने पुढे चालवत यंदाही ५०० गरजू कुटुंबांची दीपावली गोड केली आहे. मागील चार वर्षांपासून जनविश्वास को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करून दीपावलीचा आनंद वाटला जात आहे.

या वर्षी तालुक्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. त्या पार्श्वभूमीवर जनविश्वास समूहाने सामाजिक बांधिलकी जपत “अन्नदान हे श्रेष्ठ दान” या उपक्रमांतर्गत ५०० कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य वाटप केले. हा उपक्रम शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी जनविश्वास बँकेत सहाय्यक निबंधक सुनिता ढोकळे व सहाय्यक सहकार अधिकारी के. जी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी चेअरमन संतोष वीर म्हणाले, “हे कार्य आम्ही दरवर्षी अधिक ताकदीने करतो आणि या कार्याला जनविश्वास बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार तसेच व्यापारी वर्ग यांचा सहकाररूपी आशीर्वाद लाभत आहे. ठेवीदारांचा विश्वास हा आमच्या बँकेचा सर्वात मोठा भांडवल असून आम्ही सर्व व्यवहार पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे करत आलो आहोत आणि पुढेही करत राहू.”

या कार्यक्रमास रवी लोंढे, आकाश शेंडगे, सोमनाथ टकले, सुजित जिकरे, कल्पेश राऊत, उमेश काळे, सचिन माळी, विवेक जोगदंड, रणजीत वाघमारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवेच्या माध्यमातून सहकाराचा खरा अर्थ जनविश्वास बँक सातत्याने जपत आहे, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

Web Title : जनविश्वास बैंक ने 500 जरूरतमंद परिवारों की दिवाली अन्नदान से रोशन की।

Web Summary : जनविश्वास बैंक ने अपनी परंपरा को जारी रखते हुए, भूम, धाराशिव में 500 जरूरतमंद परिवारों को खाद्य सामग्री वितरित की, जिससे उनकी दिवाली मीठी हो गई। अध्यक्ष संतोष वीर द्वारा संचालित इस पहल ने आवश्यक आपूर्ति प्रदान की, खासकर हाल ही में बाढ़ से प्रभावित किसानों के लिए महत्वपूर्ण।

Web Title : Janvishwas Bank brightens Diwali for 500 needy families through food donation.

Web Summary : Janvishwas Bank, continuing its tradition, distributed food grains to 500 needy families in Bhum, Dharashiv, making their Diwali sweeter. The initiative, driven by Chairman Santosh Veer, provided essential supplies, especially crucial after recent floods affected farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.