सफाई कामगारांना साहित्यांचे किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:32 IST2021-05-10T04:32:35+5:302021-05-10T04:32:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भूम : काेराेनाची दाहकता लक्षात घेऊन शहरातील काही तरूणांनी पुढे येत ग्रामीण रूग्णालयालर १० ऑक्सिमीटर, दाेन ...

Distribution of kits to cleaners | सफाई कामगारांना साहित्यांचे किट वाटप

सफाई कामगारांना साहित्यांचे किट वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

भूम : काेराेनाची दाहकता लक्षात घेऊन शहरातील काही तरूणांनी पुढे येत ग्रामीण रूग्णालयालर १० ऑक्सिमीटर, दाेन थर्मामीटर तसेच सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड यांच्याकडे ही मदत ९ मे राेजी सुपूर्द करण्यात आली.

काेराेनाच्या संकटामध्ये अडचणीत असलेल्या लाेकांना दानशूर व्यक्ती मदत देण्यासाठी पुढे येत आहेत. ग्रामीण रूग्णालयाला अनेकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे वस्तू, साहित्याच्या स्वरूपात मदत दिली आहे. मदतीचा हा ओघ सुरूच आहे. शहरातील तनवीर काजळेकर, प्रतीक पाटील, दीपक माळी यांनी रूग्णालयीन प्रशासनाशी चर्चा करून काेणकाेणत्या साहित्याची कमी आहे, याची माहिती घेतली हाेती. त्यानुसार या तरुणांनी रूग्णालयाला ऑक्सिमीटर, थर्मामीटर आदी साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप जोगदंड, डॉ. भगवान गोपाळघरे, धनाजी मस्कर, गौस शेख, वसीम काजळेकर उपस्थित होते.

Web Title: Distribution of kits to cleaners