किराणा किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:36+5:302021-05-19T04:33:36+5:30

कळंब : श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने ‘सेवा सप्ताह’ साजरा होत आहे. यानुसार बहुला ...

Distribution of grocery kits | किराणा किट वाटप

किराणा किट वाटप

कळंब : श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने ‘सेवा सप्ताह’ साजरा होत आहे. यानुसार बहुला येथे समन्वयक सुधीर बिक्कड यांनी निराधार, गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. यावेळी अशोक शेळके, किरण सारूख उपस्थित होते.

शेतकऱ्यांना फटका (फोटो)

देवधानोरा : कळंब तालुक्यातील देवधानोरा परिसरात मागील काही दिवसांपासून वादळी वारे वाहत आहेत. यामुळे पेरूच्या फळबागांना याचा मोठा फटका बसत आहे. वाऱ्यामुळे पेरूची झाडे मोडून पडत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

प्राणायाम प्रशिक्षण

उमरगा : येथील उपजिल्हा व खासगी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी सकाळी योगा व प्राणायामाचे प्रशिक्षण दिले जात आहे. योगशिक्षक सुरेंद्र वाले हे रुग्णांना सदरील प्रशिक्षण देत असून, याचा चांगला फायदाही होताना दिसत आहे.

अधिकाऱ्यांची भेट

उस्मानाबाद : तालुक्यातील जागजी येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी भेट देऊन कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आजारी व्यक्तींचा शोध घेऊन प्राधान्याने लस देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Web Title: Distribution of grocery kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.