प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST2021-03-28T04:31:01+5:302021-03-28T04:31:01+5:30

जेवळी : तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या ‘आर्या’ प्रकल्पांतर्गत गळीत जेवळी येथे महिलांसाठी धान्य आणि कडधान्य प्रक्रिया या विषयावरील ...

Distribution of certificates to trainees | प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप

प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप

जेवळी : तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या ‘आर्या’ प्रकल्पांतर्गत गळीत जेवळी येथे महिलांसाठी धान्य आणि कडधान्य प्रक्रिया या विषयावरील दहा दिवसांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शास्त्रज्ञ वर्षा मरवाळीकर यांनी महिलांना सक्षमीकरण व उद्योजक आणि सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती, गळीत धान्यावर आधारित ऑईल मिल, रेडी टू ईट डाळीचे पदार्थ आदींची माहिती दिली. या प्रशिक्षणात सहभागी महिलांना सरपंच चंद्रकांत साखरे, प्रा. सचिन सूर्यवंशी, गृहविज्ञान शास्त्रज्ञ वर्षा मरवाळीकर, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर हुडेकर यांनी केले तर मनिषा बसवराज कारभारी यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी पंचशीला मनोहर, माधव गोरे, रूपाली कारभारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of certificates to trainees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.