आश्रम शाळेतील मुलींना सायकल वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST2021-09-03T04:34:09+5:302021-09-03T04:34:09+5:30
उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील इंदिरा गांधी आदर्श आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मुलींना सायकलींचे वाटप जिल्हा परिषद ...

आश्रम शाळेतील मुलींना सायकल वाटप
उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील इंदिरा गांधी आदर्श आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मुलींना सायकलींचे वाटप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तुळजाभवानी कारखान्याचे माजी चेअरमन सिद्रामप्पा खराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुवर्णा गुंजोटे, पंचायत समिती सदस्या शिलाताई गायकवाड, उपसरपंच अशोक राजमाने, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता राजमाने, ग्रा.पं.सदस्य संजय गुंजोटे, मंतेश पाटील, मधुकर गायकवाड, वडाचा तांडा येथील माजी सरपंच शिवराम राठोड, उपसरपंच लखन चव्हाण, पोलीस पाटील संतराम राठोड, पुनमचंद राठोड, किसन प्रास्ताविक मुख्याध्यापक विनायक राठोड यांनी केले. तर सूत्रसंचलन शिवाजी कवठे यांनी केले. यावेळी उमाकांत माळी, अतुल जावळे, धनंजय भोसले, शकंर थाटे, शिवशंकर बिराजदार आदी उपस्थित हाेते. आभार बाळू आमले यांनी मानले.