शिक्षक सभासदांना प्रवासी ट्रॉली बॅग वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:41+5:302020-12-26T04:25:41+5:30

कळंब : तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना प्रत्येक वर्षी १५ टक्के लाभांश देऊन शिल्लक राहिलेल्या रकमेतून प्रवासी ट्रॉली ...

Distribute passenger trolley bags to teacher members | शिक्षक सभासदांना प्रवासी ट्रॉली बॅग वाटप

शिक्षक सभासदांना प्रवासी ट्रॉली बॅग वाटप

कळंब : तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना प्रत्येक वर्षी १५ टक्के लाभांश देऊन शिल्लक राहिलेल्या रकमेतून प्रवासी ट्रॉली बॅगचे वाटप करण्यात आले.

अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी परमेश्वर भारती, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक निबंधक बालाजी कटकधोंड, संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, सहकार अधिकारी सतीश पुरी, शिक्षण विस्तार अधिकारी धर्मराज काळमाते, सुशील फुलारी, मधुकर तोडकर, संघाचे कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, जिल्हा चिटणीस राजेंद्र बिक्कड, जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस जेमिनी भिंगारे यांचीही उपस्थिती होती.

संस्थाध्यक्ष तथा शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी कळंब पतसंस्था ही सर्वात जास्त कर्ज वाटप करीत, सर्वत जास्त लाभांश देणारी, सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असणारी व सर्वात कमी थकबाकी असलेली पतसंस्था असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला प्रशांत घुटे, उत्रेश्वर शिंदे, अशोक डिकले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्था उपाध्यक्ष भूषण नान्नजकर, संचालक गणेश कोठावळे, संतोष ठोंबरे यांच्यासह संचालकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक भक्तराज दिवाणे व सूत्रसंचालन ज्योती ढेपे यांनी केले. आभार सुधीर वाघमारे यांनी मानले. (वाणिज्य वार्ता)

Web Title: Distribute passenger trolley bags to teacher members