मृग नक्षत्राकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:22+5:302021-06-18T04:23:22+5:30
येणेगूर : जून महिना उजाडल्यापासूनच जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली हाेती. त्यामुळे पेरणीची तयारी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या ...

मृग नक्षत्राकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास
येणेगूर : जून महिना उजाडल्यापासूनच जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली हाेती. त्यामुळे पेरणीची तयारी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, मृग नक्षत्र सुरू हाेऊन जवळपास दहा दिवसांचा कालावधी लाेटूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पेरणी खाेळंबली आहे.
उमरगा तालुक्यातील येणेगूर शिवारातील सुमारे १ हजार ६०० हेक्टर, महालिंगरायवाडी, दावलमलीकवाडी शिवारातील सातशे हेक्टर असे एकूण २ हजार ३०० हेक्टर क्षेत्र खरीप पिकांच्या पेरणीसाठी प्रस्तावित आहे. दरम्यान, यंदा चांगला पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याकडून जूनपूर्वीच करण्यात आले हाेते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे जूनच्या अगाेदरच उरकली हाेती. दरम्यान, जून महिना उजाडल्यानंतर पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या अनेक भागात जाेरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. त्यामुळे मृग नक्षत्रात पेरणी करण्याची तयारी बहुतांश शेतकऱ्यांकडून करण्यात आली हाेती. असे असतानाच मृगाने धाेका दिला. मृग नक्षत्र सुरू हाेऊन दहा दिवसांचा कालावधी लाेटला आहे. परंतु, अद्याप पेरणीयाेग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पेरणी खाेळंबली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चाैकट...
म्हणे, जूनअखेर जाेरदार पाऊस
हवामान खात्याचे उमरगा तालुका समन्वयक नकुल हरवाडकर यांच्याशी संपर्क साधला असता, आठ ते दहा दिवसांत म्हणजेच जूनअखेर तालुक्यात जाेरदार पाऊस हाेईल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याचे नमूद केले. पावसाला विलंब झाल्याने यंदा साेयाबीन, तूर यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
माेठ्या पावसाची प्रतीक्षा करा...
उमरगा तालुक्यातील बहुतांश भागात अद्याप पेरणीयाेग्य पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी किमान ८० ते १०० मिमी पाऊस हाेणे गरजेचे आहे. एवढ्या प्रमाणात पाऊस पढल्याखेरीज शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव, कृषी सहायक नितीन चेंडकाळे यांनी केले.