शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कराड विरुद्ध धस थेट सामना, मुंडेंची उपस्थिती; चर्चा निलंगेकरांची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:29 PM

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघात शेवटच्या क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी घोषित झाल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड विरुद्ध भाजपाचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस असा सामना रंगणार आहे.

- चेतन धनुरेउस्मानाबाद : उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद मतदारसंघात शेवटच्या क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी घोषित झाल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड विरुद्ध भाजपाचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस असा सामना रंगणार आहे. एकूण १००६ मतदारांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित संख्याबळ ५२७ आहे. मात्र कागदावरील आकड्यांचा मेळ प्रत्यक्ष निवडणुकीत कसा बसविला जाईल, यावर पुढचे चित्र असणार आहे.महायुतीत ही जागा भाजपाला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव भाजपात प्रवेश करण्यापूर्वीच उमेदवार म्हणून जाहीर झाले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश कराड यांना पक्षप्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. मात्र तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झालेला नसल्यामुळे अंबाजोगाई येथील काँग्रेस नेते राजकिशोर मोदी यांचा अर्ज शेवटच्या दिवशी दाखल होणार होता. त्यासाठी आमदार अमरनाथ राजूरकर एबी फॉर्मसह उस्मानाबादेत दाखलही झाले. पावणेदोनच्या सुमारास आघाडीचा निरोप आला. दरम्यान, राष्ट्रवादीतून उमेदवारीची अपेक्षा असणारे उद्योजक अशोक जगदाळे यांनी बंडाचे निशाण फडकावीत अर्ज दाखल केला आहे. याशिवाय इतर पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या स्थितीतही आघाडीविरुद्ध महायुती, असाच सामना होईल.संख्याबळाचा खेळ...एकूण १००६ मतदार, त्यात काकू-नाना आघाडीसह राष्ट्रवादीकडे जवळपास ३३६, काँग्रेसकडे १९१ तर भाजपा ३०२, शिवसेना ६५, एमआयएम २०, तर अपक्षांचे संख्याबळ ९२ इतके आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने एकत्रित संख्याबळ ५२७ तर महायुतीचे ३६७ आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नळदुर्ग परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे सुमारे ३० मतदार कमी होतील, असे गृहित धरले जाते. तरीही आघाडीचे ह्यघड्याळह्ण चालणार की ह्यकमळह्ण फुलणार? हे प्रचारादरम्यान कळेल.महायुतीच्या घटक पक्षांची पाठ...महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांची उमेदवारी दाखल करताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. मात्र कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर अनुपस्थित राहिले. शिवाय, सेनेसह घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही अनुपस्थिती स्पष्ट दिसत होती. यावर पंकजा मुंडे यांनी प्रचारात सर्वजण दिसतील व मंत्री निलंगेकर हे नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर असल्याचे सांगितले. याउपरही मंत्री निलंगेकर यांच्या बंधूस उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचीही चर्चा रंगत होती.उस्मानाबाद व परभणीत आघाडी मजबूत...उस्मानाबाद-बीड-लातूर तसेच परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार. परभणीमध्ये काँग्रेस तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी, अशी बोलणी झाली असून, सभागृहातील संख्याबळ कायम ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष एकजुटीने काम करतील, असा विश्वास काँग्रेसचे आ. अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला.