शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाचा नादच खुळा! आधी बजावलं मतदानाचं कर्तव्य, मगच चढला लग्नाच्या बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:20 IST

वरात निघण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क; जिल्हा परिषद निवडणुकीचा अनोखा उत्साह.

- बालाजी बिराजदार

लोहारा (जि. धाराशिव): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यास टाळाटाळ करत असताना, हिप्परगा (रवा) येथील एका नवरदेवाने मात्र अनोखी निष्ठा दाखवली आहे. सिद्धेश्वर दत्ता वाडकर असे या नवरदेवाचे नाव असून, आज त्यांचा विवाह असतानाही त्यांनी मांडवात जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला.

हळदीच्या अंगाने गाठले केंद्र सिद्धेश्वर यांचा विवाह आज नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे पार पडणार होता. घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची ये-जा आणि वरात निघण्याची वेळ असतानाही सिद्धेश्वर यांनी ठाम भूमिका घेतली की, "मी आधी मतदान करणार आणि मगच लग्नासाठी निघणार." त्यानुसार, नवरदेवाच्या वेशातच त्यांनी हिप्परगा येथील मतदान केंद्र गाठले. त्यांच्या या कृतीने उपस्थित कर्मचारी आणि ग्रामस्थ भारावून गेले.

समाजासाठी मोठे उदाहरण मतदान केल्यानंतर सिद्धेश्वर लग्नाच्या सोहळ्यासाठी रवाना झाले. याप्रकरणी हिप्परगा (रवा) चे पोलीस पाटील संजय नरगाळे यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले की, "लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशीही मतदानाला सर्वोच्च प्राधान्य देणारे सिद्धेश्वर यांचे कृत्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कोणतेही कारण पुढे न करता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, हेच यातून अधोरेखित होते." एकीकडे सुटीचा आनंद मानून घरी बसणाऱ्या मतदारांना या नवरदेवाने आपल्या कृतीतून चपराक लगावली असून, 'लोकशाही हीच आमची खरी ताकद' असल्याचे सिद्ध केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom votes before wedding: A true commitment to democracy.

Web Summary : In Dharashiv, a groom, Siddheshwar Wadkar, prioritized voting before his wedding. Despite the wedding preparations, he cast his ballot, inspiring others to value democracy.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६dharashivधाराशिवVotingमतदानElectionनिवडणूक 2026