- चेतन धनुरेधाराशिव : तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लागल्याने इच्छुकांची प्रचंड झुंबड उडाली आहे. पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढायचीच, या ईर्ष्येने अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी झालेल्या छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या पाहून लढण्याची इच्छा किती अनावर झालीय, याची प्रचिती येते.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १६५ जागांसाठी वैध ठरलेल्या अर्जांची संख्या पाहता प्रतिजागा सरासरी १५ उमेदवार राहिले आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या जागांसाठी एकूण ९६७ अर्ज दाखल झाले होते. यापैकी ९३८ अर्ज वैध ठरले असून, दोन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. अर्जांची ही संख्या लक्षात घेता एका जागेसाठी सरासरी १७ अर्ज वैध ठरले आहेत. इच्छुकांची ही संख्या अभूतपूर्व ठरावी, अशीच आहे. दुसरीकडे पंचायत समित्यांसाठीही अशीच गर्दी आहे. एकूण ११० जागांसाठी जिल्हाभरातून १,३६० जणांनी अर्ज दाखल केले होते. यातील १,३२१ अर्ज वैध ठरले आहेत. ३८ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, एका अर्जांवर सुनावणी सुरू आहे. या वैध अर्जांची संख्या विचारात घेता एका जागेसाठी सरासरी १२ इच्छुक मैदानात उरले आहेत. आता २७ तारखेपर्यंत त्यांना अर्ज मागे घेता येणार आहेत. यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतात, हे कळू शकेल.
पंचायत समिती नको, थेट झेडपीच हवीपंचायत समित्यांपेक्षा थेट जिल्हा परिषदेतच प्रमोशन मिळवू इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी सरासरी १७ उमेदवार राहिले आहेत. पंचायत समित्यांच्या एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार आहेत. यावरून जिल्हा परिषदेचीच महत्त्वाकांक्षा ठेवून निवडणूक लढवू इच्छिणारे असल्याचे स्पष्ट होते.
तालुका गट संख्या वैध अर्ज सरासरी अर्जधाराशिव १२ २४९ २१तुळजापूर १० १३९ १४भूम ०५ ८७ १७परंडा ०५ ९२ १८उमरगा ०९ ११७ १३वाशी ०३ ४५ १५लोहारा ०४ ५१ १३कळंब ०८ १५८ २०एकूण ५५ ९३८ १७
सर्वाधिक इच्छुक, धाराशिव, कळंबमध्येजिल्हा परिषदेच्या बाबतीत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची सर्वाधिक संख्या ही धाराशिव व कळंब तालुक्यात आहे. येथील प्रति एका जागेसाठी अनुक्रमे २१ व २० उमेदवार राहिले आहेत, तर पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची सर्वाधिक सरासरी संख्या परंडा तालुक्यात प्रतिजागा १५ इतकी आहे.
Web Summary : After nine years, Dharashiv Zilla Parishad elections see a massive influx of candidates. An average of 17 applications per seat highlights intense competition. Dharashiv and Kalamb witness the highest number of aspirants.
Web Summary : नौ साल बाद, धाराशिव जिला परिषद चुनाव में उम्मीदवारों की भारी भीड़ देखी जा रही है। प्रति सीट औसतन 17 आवेदन तीव्र प्रतिस्पर्धा को दर्शाते हैं। धाराशिव और कलंब में सबसे अधिक उम्मीदवार हैं।