शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: 'पुराने जमीनही नेली आणि कर्ता पुरुषही'; चार दिवसांनी सापडला तरुणाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:36 IST

पूर ओसरला, पण दु:खाचा डोंगर कायम; तब्बल ३२ किमी अंतरावर सापडला मृतदेह, भूम तालुक्यातील तांबे कुटुंबावर कोसळला आघात

- संतोष वीरभूम ( धाराशिव ) : तालुक्यातील देवळाली येथील गणेश तांबे (३८) हा युवक मंगळवारी ( दि. २३)  पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. चार दिवसानंतर आज तब्बल ३२ किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून सापडला आहे. तालुक्यात दिनाक २२ सप्टेंबर रोजी रात्रभर पाऊस झाला होता. यामुळे देवळाली भागात पूर आला होता. या पुराच्या पाण्यात गणेश तांबे हा युवक सायंकाळी देवळाली गावातून घराकडे जात असताना वाहून गेला होता. या घटनेनंतर एनडीआरएफ टीमने तत्काळ दोन किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. यामुळे ग्रामस्थ व नातेवाईक यांची चिंता वाढली होती.

दरम्यान, आज सकाळी असू गावातील शेतकरी समाधान मासाळ हे विहिरीजवळील शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना नदीकाठी एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ गावात माहिती दिली. गावातील एक महिला देवळाली येथील असल्याने तिने ही बाब गणेशचे मामा बाबासाहेब ढगे (चिंचपूर ढगे) यांना कळवली. ढगे यांनी तत्काळ देवळाली येथे माहिती दिली. त्यानंतर तातडीने सरपंच विशाल ढगे व फिरोज खान यांनी गावातील रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या हातातील दोरा, राखी, चेहरा आणि उंचीच्या आधारे ओळख पटवण्यात आली. त्यानंतर गणेश तांबे यांचे पार्थिव देवळाली येथे नेण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

जमीनही वाहून गेलीपुराच्या तडाख्यात तांबे कुटुंबाची दोन एकर पैकी एक एकर जमीन वाहून गेली आहे. यात सोयाबीन पीक होते. एकीकडे जमिनीचे अतोनात नुकसान झालेले असताना दुसरीकडे घरातील कर्ता पुरुषही गेल्याने तांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv: Flood claims land and life; youth's body found after days.

Web Summary : Ganesh Tambe, 38, from Deolali, Dharashiv, swept away in floods, was found dead 32 km away after four days. His family also lost farmland, compounding their grief. The community mourns the loss.
टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूरRainपाऊसFarmerशेतकरी