- संतोष वीरभूम ( धाराशिव) : तालुक्यातील साडेसांगवी गावात अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील घरे, शेती तसेच शाळा पाण्याखाली आले. या पार्श्वभूमीवर भूम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने गुरुवारी ( दि. २५) गावात विशेष मदत व स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
“मदत नव्हे कर्तव्य” या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी श्रमदान, स्वच्छता, शालेय साहित्य व खाऊ वाटप, तसेच पूरग्रस्त महिलांना व मुलांना कपडे वाटप केले. अतिवृष्टी दरम्यान गावातील जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी शिरल्याने सर्व वर्ग खोल्या व शालेय साहित्य चिखलात गेले होते. त्यामुळे शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी एन.एस.एस. स्वयंसेवकांनी सर्व वर्गखोल्या व साहित्य स्वच्छ करून परिसराची साफसफाई केली.
पूराच्या पाण्यात विद्यार्थ्यांची दप्तरं, पुस्तके, वह्या वाहून गेली होती. त्यामुळे एकूण ७० विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल व जेवणाचे डबे देण्यात आले. नवीन शालेय साहित्य हातात मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी संस्थेचे उपसचिव व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे, प्रा. डॉ. तानाजी बोराडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गंगाधर काळे, डॉ. नितीन पडवळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते.
गावकऱ्यांनी केले स्वागतगावकऱ्यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “पुराच्या संकटात आम्हाला आधार व धीर देणारे हे कार्य म्हणजे खरी सामाजिक सेवा आहे,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
ही आपली जबाबदारीसमाजाप्रती असलेले कर्तव्य ओळखून आमचे एन.एस.एस. स्वयंसेवक पुढे सरसावले. गावातील शाळा, विद्यार्थी व पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देणे ही फक्त मदत नसून आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी मनापासून घेतलेली मेहनत पाहून आम्हाला अभिमान वाटतो.- डॉ. संतोष शिंदे, प्राचार्य
Web Summary : NSS volunteers from Bhum cleaned a flood-damaged school in Sade Sanghavi, providing supplies to 70 students. The initiative, emphasizing duty over aid, included clothing distribution for affected families. Villagers lauded the college's social service.
Web Summary : भूम के एनएसएस स्वयंसेवकों ने सादे संघवी में बाढ़ से क्षतिग्रस्त स्कूल की सफाई की, 70 छात्रों को सामग्री प्रदान की। 'मदद नहीं, कर्तव्य' पहल में प्रभावित परिवारों के लिए कपड़े भी वितरित किए गए। ग्रामीणों ने कॉलेज की सामाजिक सेवा की सराहना की।