शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:45 IST

भूममधील शेतकऱ्यांवर मोठे संकट; नदी काठच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त 

- संतोष वीरभूम (धाराशिव) : तालुक्यात २१ सप्टेंबर रोजी  झालेल्या पाचही मंडळांतील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. नदीकाठची हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त झाली. ७०२ हेक्टर शेती तर खरडून वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांना जीव वाचवण्यात यश आले तरी “आता पुढे जगायचे कसे?” हा प्रश्न त्यांच्या डोळ्यांत अश्रू घेऊन सतत चिंतेच्या विचाराने उभा राहत आहे.

दिनाक २२ रोजी रामगंगा व बाणगंगा नद्यांनी रात्रभर धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंचपूरजवळील तब्बल ५०० मीटर रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याच परिसरात शेतात राहत असलेले भारत रामभाऊ मोरे यांच्या घरातही पुराचे पाणी घुसले. यामुळे रात्रीच्या अंधारात कुटुंबातील सात सदस्य थरथरत होते. जीव वाचवण्यासाठी मोरे यांचा मुलगा गणेश यांनी पोटच्या दोन लहान मुलांना तासभर खांद्यावर घेऊन उभे राहिले. घरात पाणी प्रवाहाने शिरू नये म्हणून गणेश मोरे यांनी दरवाजा लावला होता. यामुळे दरवाज्याला पाणी थापून घरात काही प्रमाणात पाणी कमी येत होते. परंतु गावकऱ्यांनी मोरे यांना पाण्याचा प्रवाह वाढत आल्याने बाहेर निघा असे सांगितल्याने. मोरे यांनी घरा समोर वाहत आलेल्या लिंबाच्या झाडांचा आधार घेत वाट काढली. धाडसाने त्यांनी घरातील ७ सदस्यांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. यामुळे थोडक्यात दुर्घटना टळली. मात्र, मोरे परिवार हे शेतीवर आधारित असल्याने त्यांचे पुढचे आयुष्य पूर्णतः थांबले आहे.  मोरे यांची ३ एकर २० गुंटे शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली. यामध्ये तब्बल २ एकर द्राक्षबाग पूर्णपणे वाहून गेली, तर उर्वरित जमिनीवरील खरीप पिकेही पूर्णतः नष्ट झाली. आयुष्यभराचा घाम आणि परिश्रम क्षणात वाहून गेल्याने मोरे हतबल झाले आहेत.

“जीव वाचला खरी, पण आता शेती नाही, बाग नाही, कमाई नाही. बँकेचे कर्ज कसे फेडायचे? कुटुंब कसे चालवायचे?” अशा प्रश्नांनी मोरे यांचे मनोबल खचले असून त्यांनी डोक्याला हात लावून वाहून गेलेल्या शेती कडे पाहत टाहो फोडला आहे. या आपत्तीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यावर काळे ढग दाटून आले आहेत. शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत केली नाही तर भूम तालुक्यातील शेतकरी पुनर्वसनाऐवजी उद्ध्वस्तच होतील, अशी भीती शेतकरी वर्गातून  व्यक्त केली जात  आहे.

१४५ जनावरे दगावली, हजारो हेक्टर शेतीचे नुकसानतालुक्यात झालेली अतिवृष्टीने नदीकाठी राहत असलेल्या नागरी वस्ती व जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने २ दिवसात १४५ जनावरे दगावली आहेत. यामध्ये काही वाहून गेली तर काही जाग्यावरच दगावली आहेत. ३०७ घरांची परझड झाली आहे. तर तब्बल ७०२ हेक्टर शेती खरडून वाहून गेली असून हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. अशी माहिती तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले आहे. ज्या शेतीवर पूर्ण परिवार अवलंबून आहे. ती शेतीच खरडून वाहून गेल्याने ती पुन्हा कशी तयार करायची व कसायची या चिंतेने मी हातबल झालो आहे भारत मोरे चिंचपूर येथील शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊसfloodपूर