धाेत्री गाव झाले काेराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:14+5:302021-06-18T04:23:14+5:30
तामलवाडी -‘माझे गाव, काेराेनामुक्त गाव’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे दाेन्ही उपक्रम धाेत्री गावात पूर्ण क्षमतेने राबविण्यात आले हाेते. ...

धाेत्री गाव झाले काेराेनामुक्त
तामलवाडी -‘माझे गाव, काेराेनामुक्त गाव’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे दाेन्ही उपक्रम धाेत्री गावात पूर्ण क्षमतेने राबविण्यात आले हाेते. त्याचाच परिणाम म्हणून सध्या हे गाव काेराेनामुक्त झाले आहे. आजघडीला गावात एकही सक्रिय रूग्ण नाही.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या वतीने ‘माझे गाव, काेराेनामुक्त गाव’ हा उपक्रम हाती घेण्यात आला हाेता. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक दक्षता व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात सर्व शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांनी संयुक्तरीत्या गावांना भेट देऊन सुमारे ३०० कुटुंबांचा सर्व्हे केला हाेता. या सर्व्हेमध्ये १८ ते ४४ वयोगटातील ५७९ व्यक्ती व ४५ वर्षांच्या पुढील ४२८ व्यक्तींचा समावेश हाेता. यानंतर ४५ वर्षांच्या पुढील ४२८ पैकी ३१५ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या कामी पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे, सरपंच अश्विनी साठे, ग्रामसेवक भीमराव झाडे, मुख्याध्यापक धनराज हत्तुरे, पाेलीस पाटील दत्ता पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. पर्यवेक्षक म्हणून रवींद्र डावरे, सतीश ढोणे, चिदानंद हिरेमठ, मनिषा वाघमारे, दीपाली होट्टे, अंगणवाडी कार्यकर्ती जयाबाई गायकवाड, स्मिता मोरे, आशा कार्यकर्ती उर्मिला कदम यांनीही परिश्रम घेतले. काटगाव प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विकास सुरवसे व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कुलकर्णी धाेत्री गावातील कामाबाबत समाधान व्यक्त केले.