शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Tanaji Sawant: "त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली", तानाजी सावंतांचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 10:40 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे

उस्मानाबाद - शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रमुख शिलेदार आणि राज्याचे सार्वजनिकमंत्री तानाजी सावंतमराठा आरक्षणासंदर्भात भाषण करताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. राज्यात २०१४ ते २०१९ या कालावधीत मराठा आरक्षणासाठीदेवेंद्र फडणवीसांवर प्रचंड आरोप केले, मराठा क्रांती मोर्चे काढले, आंदोलने केली. ज्यांना ब्राह्मण म्हूणून हिणवलं गेलं. पण, त्याच ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी २०१७-१८ मध्ये भरली, असे सावंत यांनी म्हटले आहे. उस्मानाबाद येथे भाषण करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. तर, देवेंद्र फडणवीसांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची आठवण सांगितली. फडणवीसांनी २०१७-१८ मध्ये मराठा समाजाची झोळी भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं, टिकलं, दोन-तीन बॅचेस बाहेर आल्या, त्यांना नोकऱ्याही मिळाल्या. मात्र, २०१९ साली लोकांचा विश्वासघात करुन तुम्ही सत्तेत आलात, त्यानंतर सहाच महिन्यात आमचं आरक्षण गेलं, असे म्हणत सावंत यांनी राष्ट्रवादीवर प्रहार केला.

पुढील काही दिवसांत आणखीन नव्या मागण्या निघतील, आम्हाला एससीमधून आरक्षण द्या, आम्हाला ह्याच्यातून पाहिजे. पण, या मागचा कर्ता करविता कोण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना माहिती आहे. पण फक्त कोणी बोलत नाही, असे म्हणत सावंत यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. दोनवर्षे आरक्षण गेल्यापासून तुम्ही गप्प आणि सत्तांतर झाल्यानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हणत मराठा समाजाला उद्देशून सावंत यांनी भाषण केले. तसेच, होय आरक्षण आम्हाला पाहिजे, मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीलाही आरक्षण पाहिजे, आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही, असेही ते म्हणाले, 

दरम्यान, सध्या तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक मराठा समाजातील युवक नाराज असल्याचे सोशल मीडियातील पोस्टवरुन दिसून येते.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTanaji Sawantतानाजी सावंतShiv SenaशिवसेनाMaratha Reservationमराठा आरक्षण