दाेन वर्षांची मुदत, चार वर्षे लाेटूनही धाराशिवची २०८ काेटींची भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 20:04 IST2025-05-08T20:04:04+5:302025-05-08T20:04:13+5:30

२०८ काेटींचा प्राेजेक्ट, आजवर अवघे ५० काेटी रुपये मिळाले आहेत. पालिकेच्या दाव्यानुसार ७० टक्के भाैतिक (फिजिकली) कामे पूर्ण झाली आहेत.

Despite a two-year deadline and a four-year delay, Dharashiv's Rs 208 crore underground sewerage project is still delayed! | दाेन वर्षांची मुदत, चार वर्षे लाेटूनही धाराशिवची २०८ काेटींची भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच !

दाेन वर्षांची मुदत, चार वर्षे लाेटूनही धाराशिवची २०८ काेटींची भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच !

धाराशिव : शहरातील मलमूत्र ‘आउटलेट’च्या माध्यमातून एका निश्चित ठिकाणी सोडण्यात येणारी भूमिगत गटार याेजना नागरिकांच्या आराेग्याच्या दृष्टिकाेनातून महत्त्वाची मानली जाते. धाराशिव शहरासाठी सुमारे २०८ काेटी रुपये खर्चाची ही याेजना ११ मे २०२१ ला मंजूर झाली. यानंतर अवघ्या दाेन वर्षांत काम पूर्ण करण्याबाबत शासनाचे निर्देश हाेते. कामाच्या गतीनुसार शासनाकडून निधी मिळत नसल्याने याेजना मुदतीत पूर्ण झाली नसल्याचा दावा यंत्रणेकडून केला जात आहे. आजवर अवघे ५० काेटी रुपये मिळाले आहेत. पालिकेच्या दाव्यानुसार ७० टक्के भाैतिक (फिजिकली) कामे पूर्ण झाली आहेत.

धाराशिव पालिकेकडून शहरामध्ये भूमिगत गटार याेजना राबविण्याचा निर्णय जून २०१७ मध्ये घेतला हाेता. यानंतर प्रस्ताव तयार करून ताे नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. नगर प्रशासनाने ऑगस्ट २०२० मध्ये तांत्रिक मान्यता दिली. यानंतर ११ मे २०२१ राेजी शासन निर्णय निघाला. निविदा प्रक्रियेनंतर ही याेजना अवघ्या दाेन वर्षांत पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश हाेते. परंतु, आजघडीला चार ते साडेचार वर्षांचा कालावधी लाेटूनही याेजनेचे काम काही पूर्ण झालेले नाही. पाइपलाइन, चेंबर यासारखी भाैतिक कामे सुरू आहेत. प्रशासनाच्या दाव्यानुसार ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. आणखी तीस टक्के कामे हाेणे बाकी आहे. या कामांसाठी केलेल्या खाेदकामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहनधारकांसह स्थानिक रहिवासी अशा रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. असे असतानाच दुसरीकडे आणखी ३० टक्के कामे हाेणे बाकी आहे. दरम्यान, शासनाकडून या प्रकल्पासाठी सुमारे २०८ काेटी रुपये येणे आहेत. मात्र, आजवर केवळ ५० काेटी रुपयेच आले आहेत. निधीच मिळत नसल्याने ठेकेदाराकडूनही कामाची गती कमी केल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे. कामांची गती अशीच राहिल्यास भुयारी गटार याेजना पूर्ण हाेणार तरी कधी, असा प्रश्न धाराशिवकर विचारू लागले आहेत.
 

आजवर ५० काेटींवर बाेळवण...

भुयारी गटार याेजनेसाठी सुमारे २०८ काेटी रुपये मंजूर आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून कामाच्या प्रमाणात निधी मिळत नसल्याची ओरड हाेत आहे. यंत्रणेच्या दाव्यानुसार ७० टक्के भाैतिक कामे पूर्ण झाली आहेत. झालेल्या कामापाेटी किमान १०० काेटी मिळायला हवेत. परंतु, आजवर ५० काेटी रुपयेच मिळाले आहेत, हे विशेष.

कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
भुयारी गटार याेजनेच्या माध्यमातून सुमारे ३०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात येत आहे. काही भागात हे काम पूर्ण झाले आहे. चेंबरही तयार केले आहेत. मात्र, काही भागात हे चेंबर रस्त्यापेक्षा एकेक फूट वर आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या चेंबरवर वाहने आदळून अपघात घडताहेत.

३३ मीटरवर एक चेंबर

धाराशिव शहरातील ड्रेनेजच्या पाइपलाइनचे काम पूर्ण झालेल्या भागात साधारपणे ३३ मीटरवर एक चेंबर बसविण्यात आले आहे.

२०८
काेटींचा प्रकल्प

२०२१
मध्ये शासन निर्णय

०२
वर्षांची हाेती मुदत

०४
वर्षे लाेटूनही कामे अपूर्ण

५०
काेटी रुपयेच मिळाले आजवर

Web Title: Despite a two-year deadline and a four-year delay, Dharashiv's Rs 208 crore underground sewerage project is still delayed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.