शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मी आहे तिथे समाधानी, पुढची २० वर्षं मोदींनीच देशाचं नेतृत्त्व करावं - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:36 IST

Devendra Fadnavis : महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

धाराशिव : लोक शुभेच्छा व्यक्त करत असतात पण मला वाटते की, पुढची २० वर्षे नरेंद्र मोदींनींच देशाचं नेतृत्व करावं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते धाराशिव दौऱ्यावर असून तिथे त्यांनी तुळजापूर मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. खरं तर देशाचे नेतृत्व करायची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळावी, असं साकडं तुळजापूर मंदिरात पुजाऱ्यांनी घातले. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पुढची २० वर्ष मोदींनींच देशाचं नेतृत्व करावं, असे फडणवीसांनी नमूद केले. ते धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

"लोक आपापल्या शुभेच्छा व्यक्त करतात पण मी ज्या ठिकाणी आहे तिथे पूर्णपणे समाधानी आहे. तसेच महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि देशामध्ये इतके सक्षम नेतृत्व आहे की, आमचं म्हणणं आहे पुढची २० वर्षे मोंदींनीच देशाच नेतृत्व करावं", असे फडणवीसांनी सांगितले.

आई तुळजाभवानीनं शक्ती दिल्यास लवकरच मंत्रिमंडळ विस्तार - फडणवीस तसेच आई तुळजाभवानीचं दर्शन घेणं ही देखील महत्त्वाची बाब आहे. मी अनेकदा आईचं दर्शन घेतलं आहे पण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आमदार राणा पाटील यांच्या आग्रहाखातर इथे दर्शनासाठी आलो, असेही फडणवीसांनी म्हटले. आमदार राणादादा पाटील यांना मंत्रीपद मिळावं यासाठी देखील साकडं घातलं जातंय या प्रश्नावर फडणवीसांनी सावधपणे उत्तर दिले. "आई तुळजाभवानीने शक्ती दिली तर लवकरच विस्तार होईल", असे विधान त्यांनी केले. दरम्यान, सगळ्या पक्षांना वाटते की, आपण निवडणूक लढवली पाहिजे. आम्हालाही हे असेच वाटते पण  याबद्दल सर्व वरिष्ठ बसून चर्चा करतील मग निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेबद्दल म्हटले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाtuljapur-acतुळजापूर