डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST2021-09-02T05:09:39+5:302021-09-02T05:09:39+5:30
फळांचे दर प्रतिकिलो ड्रगन फ्रुट २०० डाळींब १२० सफरचंद १०० ते १२० रुपये संत्रा २०० मोसंबी ५० चिकू ...

डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा भाव !
फळांचे दर प्रतिकिलो
ड्रगन फ्रुट २००
डाळींब १२०
सफरचंद १०० ते १२० रुपये
संत्रा २००
मोसंबी ५०
चिकू १००
पपई ६०
पेरू ८०
आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
मागील काही महिन्यात बाजारात सफरचंदाची आवक कमी होती. त्यामुळे त्याचे दर २०० रुपये प्रतिकिलोच्या पुढे सरकले होते. सध्या सफरचंदाचा बहार सुरु झाल्याने शिमला येथील सफरचंद बाजारात दाखल होत आहे. आवक अधिक असल्याने दर स्वस्त झाले आहेत.
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यूच्या तापामुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात.
त्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात अशक्तपणा जाणवतो. शिवाय, प्रतिकारशक्तीही कमी होते.
शरिरातील प्लेटलेट्सचे प्रमाण भरुन काढण्यासठी ड्रॅगन फ्रुटला मागणी वाढत आहे.
कोट...
सफरचंद, मोसंबीची आवक वाढल्याने त्यांचे दर उतरले आहेत. उपवासामुळे केळी, सफरचंद, संत्रा, मोसंबीला मागणी आहे. आजारी व्यक्ती, डेंग्यूच्या रुग्णांसाठी नातेवाईक ड्रगन फ्रुट, पपई खरेदी करीत आहेत.
अलीम बागवान, फळविक्रेते