द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST2021-09-23T04:36:55+5:302021-09-23T04:36:55+5:30
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या खालील बाजूस पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची टंचाई असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तेरणा ...

द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याची मागणी
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या खालील बाजूस पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची टंचाई असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तेरणा नदीवर जुन्या माकणी गावठाणच्या जवळ एक व माकणी सास्तूर शिव रस्त्यानजीक एक असे दोन द्वारयुक्त सिमेंट बंधारे बांधण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने आ.सतीश चव्हाण यांनी मंगळवारी मंत्रालयात मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली. यावेळी माकणी येथे दोन सिमेंट बंधारा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी, तसेच या अंदाजपत्रकानुसार त्वरित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आ.चव्हाण यांनी गडाख यांच्याकडे केली. या संदर्भात त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश शंकरराव गडाख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.