शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

उस्मानाबादेत चारा छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरीचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 4:25 PM

आजघडीला हाडोंग्री येथे एकमेव छावणी सुरू आहे

ठळक मुद्दे जिल्ह्यात ८९ हजार पुशधन १८२ पैकी मंजुरीसाठी पाठविले ४५ प्रस्ताव

भूम (जि. उस्मानाबाद) : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही प्रचंड गंभीर बनला आहे. चारा छावण्यांसाठी प्रशासन दरबारी धडकलेल्या १८२ प्रस्ताव चारा टंचाईची दाहकता दर्शविण्यास पुरेसी आहेत. अशा परिस्थिीत गरजेनुसार छावण्यांना मंजुरी देणे गरजेचे आहे. परंतु, आजघडीला हाडोंग्री येथे एकमेव छावणी सुरू आहे.त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे.

भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगरी भाग आहे. त्यामुळे चांगले पर्जन्यमान झाले तर शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न हाती लागते व पशुधनाच्या चाऱ्याची सोय होते. परंतु, यंदा पावासळ्यात वार्षिक सरासरीच्या अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले. परिणामी ८० हजारावर पशुधनाच्या चाऱ्या प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांकडून चारा छावण्यांची मागणी होत आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकउे सुमारे १८२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या सर्वच प्रस्तावांमध्ये प्रशासनस्तरावरून त्रुट्या काढण्यात आल्या होत्या.

संबंधित त्रुटींची पूर्तता केल्यानंतर १५१ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. आजघडील यापैकी केवळ ४५ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. असे असले तरी अद्याप यापैकी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या केवळ हाडोंग्री येथे एकमेव छावणी सुरू आहे. या छावणीत सध्या सहा हजारावर पशुधनाची सोय करण्यात आली. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल पशुपालक शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. 

दोन महिन्यानंतरही मंजुरी नाही जानेवारी महिन्यापासून चारा संपला आहे. त्यामुळे छावणीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असल्याचे पशुपालक संजय गाढवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

चारा छावणीसाठी प्रशासनाकडे साधारपणे दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव दाखल केला आहे. प्रस्तावातील त्रुटींची दोनेवळा पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला. परंतु, मंजुरी देण्यास संबंधित यंत्रणेकडून चालढकल केली जात आहे, असे उळूप येथील दत्ता काळे म्हणाले. दुष्काळ व नापिकीला कंटाळून आजवर गावातील दोन ते तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गावाची आणेवारीही २५ टक्के आहे. असे असतानाही पशुधन जगविण्यासाठी प्रशासनाकडून छावणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे पशुधनाची उपासमार होत आहे, असे राजेंद्र गपाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादdroughtदुष्काळ