मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे फटाके फोडून केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:46+5:302021-09-26T04:35:46+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून मंदिर बंद आहे. या काळात येथील व्यापारी, पुजारी बांधवाचे मोठे हाल झाले. यामुळे श्री ...

मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे फटाके फोडून केले स्वागत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून मंदिर बंद आहे. या काळात येथील व्यापारी, पुजारी बांधवाचे मोठे हाल झाले. यामुळे श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडण्याची मागणी विविध स्तरांतून होत होती. अखेर राज्य शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुळजापूरकरांना मोठा दिलासा मियाला. शनिवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ महाद्वार या ठिकाणी महाआरती करुन फटाक्याची आतषबाजी करण्यात आली, तसेच भाविकांना पेढे वाटून, जय भवानी-जय शिवाजी असा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे श्याम पवार, सुधीर कदम, पुजारी मंडळाचे किशोर गंगणे, शंकर लोभे, बापूसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, जगन्नाथ गवळी, सुनील जाधव, अमीर शेख, दिनेश रसाळ, अक्षय नाईकवाडी, जयकुमार दरेकर, संजय भोसले, चेतन बंडगर, गोपाळ खुरुद, कैलास पवार आदी उपस्थित होते.