घाटंग्री शिवारात आढळला मृत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:28 AM2021-03-07T04:28:58+5:302021-03-07T04:28:58+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात बिबट्या आला रे...च्या अफवा तर सातत्याने उडत असतातच. मात्र, पहिल्यांदाच तो आढळला पण मृतावस्थेत. घाटंग्री तांडा ...

Dead leopard found in Ghatangri Shivara | घाटंग्री शिवारात आढळला मृत बिबट्या

घाटंग्री शिवारात आढळला मृत बिबट्या

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यात बिबट्या आला रे...च्या अफवा तर सातत्याने उडत असतातच. मात्र, पहिल्यांदाच तो आढळला पण मृतावस्थेत. घाटंग्री तांडा शिवारात हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या प्रकाराने या भागात एकच खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या घाटंग्री तांडा शिवारातील एका शेतात बिबट्या दिसून आला. येथून आपली जनावरे घेऊन जात असताना शेतकरी आत्माराम जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आली. यानंतर, त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली, तेव्हा बरेच नागरिक या ठिकाणी जमा झाले. सुरुवातील बिबट्या जिवंत होता. मात्र, त्याच्या अंगात त्राण नव्हते. काही श्वान त्याचा चावा घेण्याचे प्रयत्न करीत होते. तेव्हा नागरिकांनी श्वानास हुसकावून लावत वन विभागाला याची माहिती दिली. वन परिमंडळ अधिकारी अमोल घोडके हे कर्मचाऱ्यांसह तातडीने वाहन घेऊन पोहोचले, तोपर्यंत बिबट्याने आपले प्राण सोडले होते. बिबट्या मृत झाल्याची खात्री केल्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उस्माबादच्या पशु चिकित्सालयात नेण्यात आले. येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास आणखी अवधी लागणार आहे. दरम्यान, घाटंग्री तांड्याचा परिसर हा बराचसा डोंगराळ आहे. मात्र, जंगलसदृश्य नाही. अशा या उजाड माळरानात बिबट्या आला कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे, शिवाय या परिसरातील नागरिाकंमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

स्थलांतरित असल्याचा अंदाज...

उस्मानाबाद जिल्ह्यात बिबट्याचा वावर अशात कोठेही आढळून आलेला नाही. लगतच्याच भीमाशंकर पट्ट्यात मात्र अनेक बिबटे आढळून येतात. सध्या ऊस काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बिबट्यांचा अधिवास तेथून संपुष्टात आल्याने ते स्थलांतरित होत असतात. हा मृत बिबट्याही स्थलांतरितच असावा, असा अंदाज वन परिमंडळ अधिकारी अमोल घोडके यांनी वर्तविला.

मृत्यू भुकेने...?

मृत बिबट्या हा भुकेने व्याकूळ होऊन गतप्राण झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी होती. मात्र, उत्तरीय तपासणीचा प्राथमिक अहवाल रविवारी येईल. तेव्हाच अंदाज बांधता येईल, शिवाय या बिबट्याचा व्हिसेरा नमुना घेऊन तो फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येत आहे. त्याचा अहवाल येण्यास आठ दिवस लागतील. तेेव्हाच नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वन परिमंडळ अधिकारी अमोल घोडके यांनी दिली.

060321\06osm_1_06032021_41.jpg~060321\06osm_2_06032021_41.jpg

घाटंग्री तांडा शिवारात आढळून आलेला मृत बिबट्या. मृत्यूपूर्वी अंगात त्राण नसलेल्या अवस्थेतील दृश्यही कॅमेर्यात कैद झाले आहेत. ~घाटंग्री तांडा शिवारात आढळून आलेला मृत बिबट्या. मृत्यूपूर्वी अंगात त्राण नसलेल्या अवस्थेतील दृश्यही कॅमेर्यात कैद झाले आहेत. 

Web Title: Dead leopard found in Ghatangri Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.