शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन; दररोज १५ हजार भाविकांना मिळणार मंदिरात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 1:56 PM

मंदिरे उघडली जात असली तरी मोठ्या उत्सवांना, यात्रांना परवानगी मिळालेली नाही.

ठळक मुद्देदीड वर्षांनंतर घेता येणार प्रत्यक्षात दर्शनपरराज्यातील भाविकांना दोन्ही डोस घेणे बंधनकारक

उस्मानाबाद : जवळपास दीड वर्षानंतर मंदिरांची दारे आता उघडी होत असून, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भाविकांना देवदर्शन घडणार आहे. तुळजापुरातही मंदिर उघडण्यात येत असून, दररोज १५ हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. यामध्ये परराज्यातील भाविक असतील तर त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. लस घेतली नसल्यास त्यांचा ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आवश्यक असणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या कालावधीत तुळजापुरात लाखो भाविकांची वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढलेल्या आदेशानुसार दररोज पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या कालावधीत १५ हजार भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. मात्र, हा प्रवेश केवळ दर्शनासाठी असेल, इतर विधी भाविकांना करता येणार नाहीत. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मल गन असणार आहे. मंदिरात रांगेतील भाविकांनी एकमेकांपासून ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. नवरात्र काळात जिल्ह्यात प्रवेश करताना परराज्यातील भाविकांना किंबहुना अन्य प्रवाशांनाही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे. ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांनी ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा १४ दिवस विलगीकरण पूर्ण केलेले असणे बंधनकारक असणार आहे.

कोजागिरीला तीन दिवस जिल्हाबंदी...मंदिरे उघडली जात असली तरी मोठ्या उत्सवांना, यात्रांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नवरात्रीनंतर कोजागिरीला भरणारी तुळजाभवानीची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. कोजागिरी यात्रेला भाविकांची लाखोंच्या संख्येत गर्दी उसळत असते. ही बाब लक्षात घेऊन १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीतील तीन दिवस राज्यातील तसेच राज्याबाहेरील भाविकांना जिल्हाबंदी असणार आहे. या काळात राज्यातील व राज्याबाहेरील कोणालाही तुळजापुरात प्रवेश मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद