संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST2021-02-05T08:15:09+5:302021-02-05T08:15:09+5:30
लोहारा (जि. उस्मानाबाद) : लोहारा येथे कायमस्वरूपी तहसीलदार यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ...

संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
लोहारा (जि. उस्मानाबाद) : लोहारा येथे कायमस्वरूपी तहसीलदार यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांची अनेक प्रकरणे निकालाअभावी धूळखात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव बैठक न झाल्याने धुळखात पडून आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने अनेक वेळा निवेदन देऊनही काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आराेप करीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालयासमाेर बुधवारी धरणे आंदाेेलन करण्यात आले. यानंतरही मागणी मान्य न झाल्यास १५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला. आंदाेलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, बालाजी यादव, किरण सोनकांबळे, आण्णासाहेब पवार, प्रणिक सूर्यवंशी, शरद पवार, अमोल बिराजदार, वजिर शेख, महादेव मगर, संजय खरोसे, अगद मुळे, महादेव पवार, रामेश्वर सूर्यवंशी आदी सहभागी झाले हाेते.