Crime News : धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निर्घुन हत्या झाली, ही हत्या धाराशिवच्या चौकात झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा पाटोदा चौकात ही हत्या घडली. ही हत्या जमिनीच्या वादातून घडली. हत्या झालेल्या पती -पत्नीचे नाव प्रयंका पवार आणि सहदेव पवार असं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पती पत्नीला आधी गाडीने धडक दिली. या घटनेतील आरोपी जीवन चव्हाण आणि हरीबा चव्हाण या बाप लेकासह अन्य काही जणांनी ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मृत सहदेव पवार हा १५ दिवसाआधीच जामिनावर बाहेर आला होता अशी माहिती समोर आली आहे. आरोपी आणि मृतांमध्ये जमिनीवरुन वाद सुरू होता. याच प्रकरणात पवार याच्यावर काही दिवसापूर्वी गुन्हा दाकल केला होता. तो नुकताच जामिनावर आला होता.