गर्दी जमविल्याने नऊजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:31+5:302021-07-08T04:22:31+5:30
कसबे तडवळे येथील एका समाजाच्या वतीने मागील आठवड्यात गावामध्ये देवकार्य नियोजित होते. परंतु, ही माहिती मिळाल्यानंतर ढोकी पोलीस ठाण्याचे ...

गर्दी जमविल्याने नऊजणांवर गुन्हा
कसबे तडवळे येथील एका समाजाच्या वतीने मागील आठवड्यात गावामध्ये देवकार्य नियोजित होते. परंतु, ही माहिती मिळाल्यानंतर ढोकी पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश बनसोडे यांनी गावामध्ये बैठक घेऊन कोरोनाचे नियम शिथील होईपर्यंत देवकार्य करू नये, असे सांगून संबंधित लोकांना कायदेशीर नोटीस देऊन समज दिली होती. त्यानंतर मंगळवारी कसबे तडवळे ते वाघोली रस्त्यावर या देवकार्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची माहिती पोलिसांना मंळवारी सायंकाळी मिळाल्यानंतर सपोनि सुरेश बनसोडे यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे जाऊन हा कार्यक्रम बंद केला तसेच कार्यक्रम घेणारे आबा भाऊ पवार, पोपट बाबू पवार, सुरेश रामा पवार, सिकंदर राजेंद्र पवार, प्रकाश संतराम पवार, दादा अर्जुन पवार, सुनील सायबा पवार, शहाजी मखल पवार व महादेव त्रिंबक भडके (सर्व रा. कसबे तडवळे) या नऊजणांवर शाम छत्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकाॅ गुंजकर हे करत आहेत.