१५ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:49+5:302021-07-20T04:22:49+5:30

जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराेना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यात ...

Covishield dose will be available at 15 centers | १५ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा डोस

१५ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा डोस

जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराेना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. मंगळवारी सहा ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालये, वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या १५ केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनीच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लस घेता येईल.

Web Title: Covishield dose will be available at 15 centers