वयाची शंभरी ओलांडलेल्या दाम्पत्याचे शेतात वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:20+5:302021-05-11T04:34:20+5:30
तामलवाडी : शहासाेबतच सध्या ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. यास तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गावही अपवाद नाही. ...

वयाची शंभरी ओलांडलेल्या दाम्पत्याचे शेतात वास्तव्य
तामलवाडी : शहासाेबतच सध्या ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. यास तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गावही अपवाद नाही. याही गावात काेराेनाचा उद्रेक झाला आहे. काेराेनाच्या भीतीने अनेकांनी घर साेडून शेतात वास्तव्य सुरू केले आहे. वयाची शंभरी ओलांडलेले एक दाम्पत्य मागील दाेन महिन्यांपासून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहे.
तुळजापूर तालुक्यातील मांळुब्रा गावात मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. यातील काही रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. उपाययोजना म्हणून महसूल प्रशासनाने रेड झोनमध्ये मांळुब्रा गावाचा समावेश केला. तशी घोषणा करण्यात आली. काेराेनाच्या भीतीने गावातील अनेक कुटुंबे मुलाबाळांसह शेतात वास्तव्यास गेली आहेत. दरम्यान, यामध्ये गावातीलच वयाची शंभरी ओलांडलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याचाही समावेश आहे. बुटू वडणे (१०५) व सीमिंताबाई वडणे असे संंबंधित दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य गावापासून साधारपणे तीन कि.मी. दूर असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करीत आहेत. दिवसभर झाडाच्या सावलीला थांबून रात्री पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. या ज्येष्ठ दाम्पत्याचा सांभाळ नातू गोविंद, मुलगा बाळू, मुलगी चतुराबाई हे करीत आहेत.
चाैकट...
दरराेज चार किलाेमीटर पायपीट
बटू वडणे याची मुलगी चतुराबाई यांचे सासर सांगवी आहे. वृद्ध आई सीमिंताबाई, वडील बटू हे काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीने शेतात वास्तव्यास आहेत. आई-वडिलांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी चतुराबाई मगर या नियमितपणे चार किलाेमीटर पायी चालत जाऊन काळजी घेतात.