coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:33 IST2020-06-01T13:33:06+5:302020-06-01T13:33:31+5:30

२९ मे रोजी त्रास होऊ लागल्याने महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़

coronavirus: Third victim of coronavirus in Osmanabad; 65-year-old women dies | coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू 

coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू 

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २९ मे रोजी त्रास होऊ लागल्याने महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याच दिवशी महिलेचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आला होता. 

३० मे रोजी रात्री उशिरा त्या वृध्द महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ १ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला़ सदरील महिलेस मधुमेह आजार होता़ अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ राज़ गलांडे यांनी दिली़ दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचे बळी गेल्यानंतर आता सोमवारी महिलेच्या मृत्यूने कोरोनाबळींची संख्या ३ वर जाऊन पोहोंचली आहे़

Web Title: coronavirus: Third victim of coronavirus in Osmanabad; 65-year-old women dies