शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Corona Virus : मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटाला गाडेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 7:56 PM

Corona Virus : उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे.

ठळक मुद्दे या प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त असल्याचा अहवाल

कळंब (जि.उस्मानाबाद) : राज्य सध्या आरोग्यविषयक संकटात आहे. अशाप्रसंगी याचे राजकारण कोणीही करू नये. उस्मानाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीत राज्यातील चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळाले आहे. हेही नसे थोडके. अडचणीच्या काळात मतभेद बाजूला ठेवत महाराष्ट्र एकत्र येतो व संकटाला गाडतो, असे उद‌्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथील व्हर्च्युअल सोहळ्यात काढले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली असून, हे ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे व्हर्च्युअली उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे रक्तातील साखर वाढत आहे. अशावेळी साखर कारखानेच मदतीला पुढे येत आहेत, हा योगायोगच. धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प हा ऑक्सिजनचा नव्हे तर जीव वाचविण्याचा आहे. राज्यात चाचण्या व बेडची संख्या वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. चाचणीसंदर्भात अधिक सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या संकटावर महाराष्ट्र मात करेल, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील, शंकरराव गडाख यांनीही मनोगते व्यक्त करून कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले.

प्रत्येक जिल्ह्यात हवेत प्रकल्प : गडकरीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिक्विड ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भातील अडचणी मांडत भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारे असे प्रकल्प उभारावे लागतील, असे सुचविले. तसेच देशातील २० टक्के साखर इथेनॉलमध्ये उपयोगात आणल्यास ६० लाख टन साठा वापरात येईल. यामुळे गोडाउनमध्ये बसून असलेल्या साखरेवरील व्याजाचा भुर्दंड कमी होईल. याकडेही कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेOsmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या