खासगी प्रयोगशाळेतही कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:39+5:302021-06-03T04:23:39+5:30

कळंब : शहरात यापुढे खासगी रुग्णालय व त्यांच्याशी संलग्नित प्रयोगशाळेत कोविड चाचणी करण्यासाठी संशयित रुग्णांचा आरटीपीसीआर स्वॅब संकलित करणे ...

Corona testing is also mandatory in private laboratories | खासगी प्रयोगशाळेतही कोरोना चाचणी बंधनकारक

खासगी प्रयोगशाळेतही कोरोना चाचणी बंधनकारक

कळंब : शहरात यापुढे खासगी रुग्णालय व त्यांच्याशी संलग्नित प्रयोगशाळेत कोविड चाचणी करण्यासाठी संशयित रुग्णांचा आरटीपीसीआर स्वॅब संकलित करणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार अशा प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या सेवा तातडीने अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मागच्या दोन महिन्यांत कोरोनाच्या प्रकोपाने हैराण केले होते. यातच आता आकडे कमी होत असले तरी चाचण्यांची संख्याही घटतच चालली आहे. जिल्हास्तरावर प्रयोगशाळेची क्षमता वृद्धिंगत झाली असताना आरटीपीसीआर टेस्ट घटल्या आहेत.

यातच खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण कोरोना संशयित असू शकतात. अशीच स्थिती लॅब टेक्निशियन यांच्याकडे तपासणी करणाऱ्यांची देखील असू शकते. यामुळेच प्रत्येक संशयितांची तपासणी व्हावी, याकरिता खासगी रुग्णालय व त्यांच्या संलग्नित लॅबमध्ये कोविड टेस्ट होण्याची गरज व्यक्त केली जात होती.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी झालेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये यासंबंधी आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी कळंब शहरातील खासगी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या सेवा अधिग्रहित करण्याचा तातडीने निर्णय घेतला आहे.

चौकट...

स्वॅब संकलन; सुविधा पुरवणार

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी बुधवारी शहरातील जास्त ओपीडी, आयपीडी असलेल्या रुग्णालय, डॉक्टर, त्यांच्याशी संलग्न लॅब तसेच स्वतंत्र लॅब चालवणारे टेक्निशियन यांना आपल्या रुग्णालयात, लॅबला आलेल्या संशयित व्यक्तीचा आरटीपीसीआर स्वॅब घ्यावा, तो दररोज दुपारी एक वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावा, असे सूचित केले आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी कोणतीही आकारणी केली जाणार नाही. आवश्यक ते किट व प्रशिक्षण देण्याचे काम उपजिल्हा रुग्णालय करणार आहे, असे डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले.

Web Title: Corona testing is also mandatory in private laboratories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.