तीन गावांत कोरोनाचा पुन्हा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST2021-04-07T04:32:53+5:302021-04-07T04:32:53+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तामलवाडीसह वडगाव, सुरतगाव, सांगवी, मांळुबा, कदमवाडी, काटी, केमवाडी, पांगरदरवाडी, धोत्री, देवकुरळी, पिंपळा (बु), खडकी, शिवाजीनगर ...

तीन गावांत कोरोनाचा पुन्हा प्रवेश
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तामलवाडीसह वडगाव, सुरतगाव, सांगवी, मांळुबा, कदमवाडी, काटी, केमवाडी, पांगरदरवाडी, धोत्री, देवकुरळी, पिंपळा (बु), खडकी, शिवाजीनगर लमाण तांडा या गावात कोरोनाने चांगलांच हैदोस घातला होता. त्यावेळी एकूण १४१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते त्यानंतर. तब्बल तीन महिन्यानंतर मांळुब्रा, सावरगाव आणि काटी या मोठ्या गावात कोरोनाने प्रवेश मिळविला आहे. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत ६५० जणांनी याचा लाभ घेतला. दरम्यान, प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांकडून मात्र फिजिकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने कार्यवाहीची मोहीम राबवून नागरिकांना नियम पाळण्यास भाग पाडावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.