३७ केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:48+5:302021-09-27T04:35:48+5:30
साडेतीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही. शिवाय, येत्या ...

३७ केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक डोस
साडेतीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही. शिवाय, येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सोबतच ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन व २५ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने लस घेता येईल. सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत केंद्रावर लस मिळणार आहे.
येथे मिळेल कोव्हॅक्सिन
मुरुम, लोहारा, सास्तूर, तेर, भूम, वाशी ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय या केंद्रावर कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन केले आहे.
या ठिकाणी मिळणार कोविशिल्ड
उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, महादेव मंदिर, नगर परिषद सभागृह, कळंब येथील फुले-आंबेडकर वाचनालय, विठ्ठल मंदिर, जुने पोस्ट कार्यालय, तुळजापूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय, सराया धर्मशाळा, तुळजाभवानी मंदिर, नवीन बसस्थानक, परंडा येथील सिध्दवाल कॉम्प्लेक्स, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, लोहारा येथील भारतमाता मंदिर, व्यंकय्या ककय्या नगर, विठ्ठल मंदिर, वाशी येथील शिवशक्तीनगरातील जि.प. प्रा. शाळा, मन्मथ स्वामी मठ, भूम येथील नगर परिषद नाट्यगृह, रविंद्र हायस्कूल, मुरूम येथील अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर, अंबाबाई मंदिर, जिल्हा परिषद विशेष शाळा, सास्तूर येथील अंगणवाडी क्रमांक ४, उस्मानाबाद येथील पोलीस हॉस्पिटल या ठिकाणी कोविशिल्ड लस मिळेल.